देवोलीना भट्टाचार्य आणि अभिजीत बिचुकलेमध्ये वाद, रागाच्या भरात देवोलिनाने बिचकुलेवर ओतला पाण्याचा ग्लास


बिग बॉस १५ मध्ये रोज नवीन वाद भांडणं पाहायला मिळतात आणि या घरामध्ये खूप लवकर नाती बदलतात. कोण कोणाचा मित्र बनेल आणि कोण कोणाचा वैरी हे कोणीच कोणाला सांगू शकत नाही. या शोच्या एका भागामध्ये कोणी एकमेकांचे मित्र असतील तर दुसऱ्या भागात तेच दोन व्यक्ती एकमेकांचे शत्रू बनतील. मागील अनेक दिवसांपासून राखी सावंत आणि देवोलीना भट्टाचार्य या दोघींची चांगली मैत्री पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे अभिजित बिचकुले आणि देवोलीना यांच्यामध्ये होणारा टोकाचा वाद सुद्धा दिसत आहे. काही दिवसांपासून या दोघांमध्ये वाद होत असून, अभिजित बिचकुलेला त्याच्या वागणुकीवर सलमान खानने देखील फटकार लावली होती. आता पुन्हा एकदा त्या दोघांमध्ये भांडणाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी बिचुकले यांना त्यांची मस्ती पुन्हा एकदा भारी पडली आहे. या वेळी देवोलीनाने अभिजीत बिचकुलेवर पाण्याने भरलेला ग्लास फेकला.

झाले असेल की, देवोलीना आणि राखी बेडरूममध्ये बोलत असतात. याच दरम्यान राखी तिला बोलते की, “मी आपल्या मैत्रीबद्दल खूप पझेसिव्ह आहे आणि मला आवडत नाही की तू इकडे तिकडे फिरत असतेस. या दोघींचे बोलणे ऐकून अभिजीत असे काही बोलतो की, देवोलीना त्याच्यावर खूप भडकते.

राखीचे हे बोलणे ऐकून देवोलीनाना तिला चिडवते की, राखी पझेसिव्ह होत आहे. याच वेळी पाठीमागे बेडवर झोपलेला अभिजीत हसायला लागतो आणि त्या दोघींच्या नात्यावर काही बोलून जातो. जे ऐकून राखी आणि देवोलीना भडकतात. देवोलीना पाण्याने भरलेला ग्लास घेऊन अभिजीतकडे जाते तर दुसरीकडे राखी अभिजीतला ओरडते.

राखी देवोलीनाला बोलते मार त्याला मार, त्यावेळी देवोलीना पाण्याने भरलेला ग्लास हातामध्ये घेऊन अभिजीतला विचारते काय बोललास? त्याच दरम्यान अभिजीत तोंडावर चादर घेऊन झोपतो आणि देवोलीनाला म्हणतो, ‘असे नको करू.’ पण देवोलीना त्याला सारखे विचारते की तू काय बोलला? या प्रश्नाचे उत्तर अभिजीत देत नाही. देवोलीना पाण्याने भरलेला ग्लास अभिजीतवर ओतते.

देवोलीना अभिजीतवर पाणी ओतते आणि म्हणते, माफी माग. पण अभिजीत काही सॉरी बोलत नाही. तो बोलतो ‘सॉरी का बोलू.’ तो असे देखील बोलतो की, ‘राखी तुझ्यासाठी पझेसिव्ह आहे.’ ती पुन्हा एकदा अभिजीतकडे पाण्याने भरलेला ग्लास घेऊन जाते आणि बोलते, ‘सॉरी बोल’ परंतु अभिजीत तिला काही सॉरी बोलत नाही.

याच दरम्यान देवोलीनाच्या या वागणुकीवर अभिजीत बोलतो मी बदला घेऊनच राहणार. अभिजीत असे बोलतो की, या पाण्याचा बदला तो घेऊनच जाणार. हे जर मी केले नाही तर माझे नाव अभिजीत नाही असे देखील म्हणतो. देवोलीना बोलते की, ‘राखी आणि माझ्या बद्दल परत काही बोलला तर मी पण तुला बघून घेईल.’ आता यावर पुढे काय होते ते बघण्यासाठी सर्वच प्रेक्षक खूप उत्सुक आहेत.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!