Monday, July 15, 2024

बापरे! बिग बॉसमध्ये हे काय घडलं? देवोलीनाने घेतला अभिजीत बिचुकलेच्या हाताचा चावा, भाऊ चिडला आणि…

आता ‘बिग बॉस १५’च्या फिनालेला फक्त दोन आठवडे उरले आहेत. या आठवड्यात घरामध्ये ‘टिकीट टू फिनाले’ टास्क सुरू आहे, जे मिळवण्यासाठी कुटुंबातील उर्वरित सदस्य जीव मुठीत धरून लढत आहेत. पण या टास्क दरम्यानच असे काही घडले की, ते पाहून प्रेक्षकही थक्क झाले.

टास्क दरम्यान तेजस्वी प्रकाशला (Tejasswi Prakash) तिचा राग अनावर झाला आणि तिने बॉल घेऊन अभिजीत बिचुकलेला (Abhijeet Bichukle) मारले. तर दुसरीकडे, देवोलीना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee) त्याचा हात जोरात चावते. त्यानंतर अभिजीत प्रचंड रागावला आणि दगड घेऊन तिला मारायला तिच्यामागे धावू लागला.

कलर्स टीव्हीने नुकताच त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर आगामी एपिसोड प्रोमो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये तिघांचे जोरदार भांडण होताना दिसत आहे. प्रोमोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तेजस्वी आणि अभिजीत आपापल्या बास्केटमध्ये चेंडू भरत आहेत. पण त्याच दरम्यान अभिजीत तेजस्वीचा चेंडू हिसकावून घेण्यास सुरुवात करतो. या दरम्यान तेजस्वी आणि अभिजीतमध्ये बाचाबाची होऊन ती पडते. त्यानंतर रागाच्या भरात तेजस्वी त्याच चेंडूने अभिजीतला मारते.

यानंतर देवोलीना अभिजीतच्या बास्केटमधून चेंडू काढण्याचा प्रयत्न करते आणि या प्रयत्नात ती अभिजीतच्या हाताचा चावा घेते. देवोलीना चावल्यानंतर अभिजीतलाही भयंकर राग येतो आणि तो म्हणतो, दार उघडा आणि हिला बाहेर काढा. यानंतरही अभिजीतचा राग शांत होत नसल्याने, तो दगड उचलून देवोलीनाला मारण्यासाठी धावतो. आता तिघांमधील हे भांडण कुठपर्यंत जाणार, हे एपिसोड पाहिल्यानंतरच कळेल.

मंगळवारी (१८ जानेवारी) अभिजीत त्याच्या कुटुंबीयांना व्हिडिओ कॉलद्वारे भेटला होता. तेव्हा देवोलीनाने त्याच्या कुटुंबाला भेटण्यास नकार दिला होता. अभिजीतच्या कुटुंबाशी आपला काहीही संबंध नाही, असे देवोलीनाने स्पष्टपणे सांगितले होते.

हेही वाचा :

हे देखील वाचा