Tuesday, December 24, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘देवों के देव महादेव’ची ‘पार्वती’ होणार नवरी, साखपुड्याचे फोटो व्हायरल

देवों के देव महादेव‘ या लोकप्रिय टीव्ही शोमध्ये माँ पार्वतीची भूमिका साकारून घराघरात प्रसिद्ध झालेली अभिनेत्री सोनारीकी भदोरिया बऱ्याच दिवसांपासून लाइमलाइटपासून दूर आहे. टीव्हीशिवाय सोनारिका तिच्या स्पष्टवक्ते आणि बोल्ड स्टाइलसाठीही ओळखली जाते. अभिनेत्रीचे सोशल मीडिया अकाउंट तिच्या ग्लॅमरस फोटोंनी भरलेले आहे. आता सोनारीकीबाबत एक माेठी बातमी समोर आली आहे. बातम्यांनुसार, अभिनेत्री लवकरच तिच्या बॉयफ्रेंडसोबत लग्नगाठ बांधणार आहे.

सोनारिका भदोरिया (sonarika bhadoria) हिने तिच्या साखरपुड्याचे फाेटाे तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. फोटोंमध्ये, अभिनेत्री तिचा हाेणारा नवरा आणि कुटुंबासह या खास दिवसाचा आनंद घेताना दिसत आहे. साखरपुड्याचे सुंदर फाेटाे शेअर करताना, अभिनेत्रीने एक सुंदर नोट लिहिली आहे की, “2.12.2022…माझे पुर्ण मन माझ्या पुर्ण जीवनासाठी…मी स्वतःला आयुष्यभराची भेट दिली आहे …साखरपुड्याचे खूप खूप अभिनंदन विकास.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonarika Bhadoria (@bsonarika)

सोनारिका भदोरियाच्या लूकबद्दल बोलायचे झाले, तर अभिनेत्रीने साखरपुड्यात सिल्व्हर रंगाची साडी परिधान केली हाेती. त्याचवेळी तिच्या नवऱ्याने पांढऱ्या रंगाच्या थ्री पीस सेट परिधान केला हाेता. अभिनेत्रीचा हा साखरपुडा सोहळा बीचवर आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला अभिनेत्रीच्या कुटुंबाव्यतिरिक्त तिचे काही जवळचे मित्र उपस्थित होते. सोनारिकाने साखरपुड्याच्या वेळी खास केकही कापला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonarika Bhadoria (@bsonarika)

सोनारिकाने 2011 मध्ये ‘तुम देना साथ मेरा’ या टीव्ही शोमधून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर ती ‘देवों के देव’मध्ये मोहित रैनीसोबत पार्वतीच्या भूमिकेत दिसली. या शोमुळे अभिनेत्रीला खूप प्रसिद्धी मिळाली. अभिनेत्रीच्या, फिल्मी करिअरबद्दल बोलायचे झाले तर, सोनारिकाचा पहिला चित्रपट 2015 मध्ये आलेला तेलुगू चित्रपट होता. यानंतर तिने 2018 मध्ये हिंदी टेलिव्हिजनवर पुनरागमन केले आणि ती शेवटची ‘इश्क में मरजावां’ मध्ये दिसली. (devon ke dev mahadev fame actre`s`s sonarika bhadoria got engaged with businessman boyfriend see viral roka ceremony photos)

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
टिक टॉकवर 2 लाख फॉलोव्हर्स असणाऱ्या 21 वर्षीय मुलीचे निधन; काय होती शेवटची पोस्ट?

अरे व्वा! चिरंजीवी लवकरच बनणार आजोबा, लग्नाच्या 10 वर्षांनंतर राम चरणच्या घरी हलणार पाळणा

हे देखील वाचा