साऊथ सुपरस्टार चिरंजीवी यांचा मुलगा आणि प्रसिद्ध अभिनेता राम चरण हा नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत असतो. यावर्षी मार्चमध्ये त्याचा ‘आरआरआर‘ हा सिनेमा रिलीज झाला होता. तेव्हापासून त्याची चांगलीच चर्चा रंगली होती. अशात त्याच्याबद्दल आनंदाची बातमी समोर येत आहे. राम चरण आणि त्याची पत्नी उपासना कामिनेणी कोनिडेला हे लवकरच आई-बाबा होणार आहेत. या जोडप्याने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून अधिकृत घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, अभिनेता लग्नाच्या 10 वर्षांनंतर वडील बापमाणूस बनणार आहे.
राम चरणसाठी 2023 खूपच खास
अभिनेता राम चरण (Ram Charan) याच्यासाठी 2023 हे वर्ष खूपच खास होणार आहे. सोशल मीडियावर राम चरणने एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये मारुतीचा फोटो असल्याचे दिसत आहे. तसेच, या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “श्री हनुमान जीच्या कृपेने, आम्हाला ही घोषणा करताना खूप आनंद होत आहे की, राम चरण आणि उपासना त्यांच्या पहिल्या बाळाची अपेक्षा करत आहेत. प्रेम आणि आभारासह सुरेखा आणि चिरंजीवी कोनिडेला, शोभना आणि अनिल कामिनेणी.”
View this post on Instagram
राम चरणची पत्नी उपासना कोनिडेला हिनेही अशीच पोस्ट शेअर केली आहे.
View this post on Instagram
‘लग्नानंतर प्रेग्नंट होणे माझा निर्णय’
एकदा माध्यमांशी बोलताना उपासनाने म्हटले होते की, “लग्नानंतर प्रेग्नंट होणे माझा निर्णय आहे. आम्ही विचार केला की, आम्हाला सध्या मूल नकोय. तसेच, दुसरीकडे, मला प्रेग्नंसीबद्दल भीती आहे. माझे वजन कमी होत आहे. आमच्याकडे याबद्दल स्पष्टता आहे की, मूल कधी जन्माला घालायचे.”
यापूर्वी उपासनाला वाटायची आई बनण्यास भीती
दुसऱ्या एका मुलाखतीदरम्यान उपासना म्हणाली होती की, “मला आई बनण्याची भीती वाटते. कधीच योग्य वेळ नसते. मात्र, माझे मित्र महान उदाहरण देत आहेत आणि मी माझा थोडा शोध घेतला. कदाचित हे खूपच लवकर होईल. हे चांगले आहे की, आमच्या मुलाचे गर्भात येण्यापूर्वीच त्याच्याबद्दल इतके अंदाज लावले जात आहेत. जेव्हा तो जन्म घेईल, तेव्हाचा तर विषयच सोडा.”
राम आणि उपासनाचे लग्न
राम चरण आणि उपासना कोनिडेला (Ram Charan And Upasana Konidela) यांनी एकमेकांना 1 वर्षे डेट केल्यानंतर 14 जून, 2012 रोजी संसार थाटला होता. यावर्षी जुलै महिन्यात उपासना प्रेग्नंट असल्याच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या. मात्र, उपासनाने तिची भूमिका मांडली होती. जुलैमध्येच राम आणि उपासना यांनी त्यांच्या लग्नाचा 10वा वाढदिवस इटलीमध्ये साजरा केला होता. (south superstar ram charan his wife upasana kamineni is pregnant couple expecting their first child know more)
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
टिक टॉकवर 2 लाख फॉलोव्हर्स असणाऱ्या 21 वर्षीय मुलीचे निधन; काय होती शेवटची पोस्ट?
‘रणवीर तू सुपरस्टार आहेस’, गर्दीत अडकलेल्या मुलासोबत ‘असे’ केल्याबद्दल सर्वत्र होतंय अभिनेत्याचं कौतुक