Saturday, April 20, 2024

कंगना रणौतच्या ‘धाकड’ चित्रपटातील ‘शी इज ऑन फायर’ गाणे प्रदर्शित, दिसला अभिनेत्रीचा जबरदस्त अंदाज

कंगना रणौतचे (kangana ranaut) तिच्या आगामी ‘धाकड‘ (dhakad) चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित झाले आहे. ‘शी इज ऑन फायर’ असे या गाण्याचे नाव आहे. हे गाणे कंगना आणि अर्जुन रामपाल (Arjun rampal) यांच्यावर चित्रीत करण्यात आले आहे. बादशाहने (Badshah) हे गाणे लिहिले आणि संगीतबद्ध केले आहे. निकिता गांधी आणि बादशाह यांनी हे गाणे एकत्र गायले आहे.

‘धाकड’च्या मागील सर्व प्रोमो व्हिडिओप्रमाणे, येथेही कंगना तिच्या एजंट अग्नी अवतारात आकर्षक दिसत आहे. चित्रपटात खलनायकाची भूमिका करणारा अर्जुन रामपाल बंदूक घेऊन दिसत आहे. व्हिडिओमध्ये अर्जुन रामपाल बॅड बॉय स्टाईल दाखवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहे,

गाण्याच्या चित्रीकरणाचा तिचा अनुभव सांगताना कंगनाने एका मुलाखतीत म्हटले आहे की, “बादशाहने ज्या प्रकारे संगीतबद्ध केले आहे ते मला आवडल्याने गाण्याचे शूटिंग खूप धमाकेदार होते. हे गाणे जीवनाने भरलेले आहे आणि त्याची लय तुम्हाला मंत्रमुग्ध करते. ‘शी इज ऑन फायर’ एजंट अग्नीची शक्ती दर्शवते, ते एका मिशनवर कसे आहेत आणि त्यांना त्यांचे ध्येय साध्य करण्यापासून कोणीही का रोखू शकत नाही.”

माध्यमातील वृत्तानुसार संगीतकार-गायक बादशाह म्हणाला होता, “गाणे आकर्षक अशा पद्धतीने तयार केले पाहिजे, परंतु ते चित्रपटाचे सार कॅप्चर करू शकेल आणि त्यातील मुख्य पात्राची संवेदनशीलता प्रतिबिंबित करेल. गाण्याचे शीर्षक एजंट अग्नीवर आधारित आहे आणि ती तिच्या मिशन दरम्यान तिची ताकद कशी मिळवते हे सांगते. अर्जुन रामपालने खलनायकाची भूमिका साकारली असून या गाण्यात दोघेही एकमेकांच्या विरोधात दाखवले आहेत.”

‘धाकड’ चित्रपटात कंगना रणौत आणि अर्जुन रामपाल यांच्याशिवाय शाश्वत चॅटर्जी आणि दिव्या दत्ता मुख्य भूमिकेत आहेत. कंगनाचे चाहते २० मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणाऱ्या ‘धाकड’ या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा