Thursday, April 24, 2025
Home अन्य धनश्री वर्माने युजवेंद्र चहलसोबत बर्फात ‘टिप टिप बरसा’ गाण्यावर केला डान्स नंतर मागितली फॅन्सची माफी

धनश्री वर्माने युजवेंद्र चहलसोबत बर्फात ‘टिप टिप बरसा’ गाण्यावर केला डान्स नंतर मागितली फॅन्सची माफी

क्रिकेटर युजवेंद्र चहल याची पत्नी धनश्री वर्मा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. धनश्री तिच्या डान्स व्हिडिओसाठी खूप प्रसिद्ध आहे. तिच्या डान्सचे व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूप आवडतात. तिचा इंस्टाग्रामवर खूप मोठा चाहतावर्ग आहे. धनश्री वर्मा तिच्या चाहत्यांसोबत नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात असते. चाहत्यांसाठी फोटो डान्सचे व्हिडिओ नेहमी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तिच्या सर्व व्हिडिओना चाहते खूप प्रेम देतात. काही दिवसांपूर्वी धनश्रीने तिचा एक डान्स व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडिओला पाहून नेटकऱ्यांचे सर्व लक्ष तिच्याकडेच आहे.

युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. ते त्यांच्या लग्नाचा वाढदिवस करण्यासाठी दोघे कश्मीरला गेले आहेत. ते कश्मीरमध्ये पोहचले आणि तिथे बर्फवृष्टी चालू झाली आहे. बर्फामुळे तिथे बर्फाची पांढरी चादर पसरली असून, धनश्री आणि युजवेंद्र हे त्या बर्फाचा पुरेपूर आनंद घेत आहेत. त्यांचे त्या ट्रिपचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याच ट्रिपचा एक व्हिडिओ धनश्रीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये धनश्री ‘सूर्यवंशी’ सिनेमातील ‘टिप टिप बरसा पाणी’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये धनश्री आणि युजवेंद्र बर्फात मस्ती करताना दिसत असून, धनश्री टिप टिप बरसा पाणी गाण्यावरील कॅटरिनाच्या डान्स स्टेप्स करत आहे. हा तिचा बर्फातील डान्स नेटकऱ्यांना खूप आवडला आहे.

हा व्हिडिओ शेअर करत तिने लिहिले, “‘टिप-टिप बरसा स्नो…’ प्रामाणिकपणे सांगायचे तर या ठिकाणचे सौंदर्य, आजूबाजूचे स्वर्गासारखे वातावरण तुम्हाला नक्कीच खूप काही शिकवेल.” पुढे तिने माफी मागत लिहिले, “मला माफ करा मी साडी नाही नेसू शकली.” तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी भरभरून लाईक्सचा वर्षाव केला आहे.

या व्हिडिओमध्ये धनाश्रीने निळ्या रंगाची टोपी, जीन्स आणि त्यावर काळया रंगाचे जॅकेट घातले आहे. तिने तिचे केस मोकळे सोडले असून, न्यूड मेकअप आणि गुलाबी लिपस्टिक लावली आहे.

हेही वाचा-

हे देखील वाचा