नुसरत जहाँने ख्रिसमसच्या निमित्ताने मुलासोबत फोटो केला शेअर; म्हणाली ‘हा फक्त एक सीझन नाही, तर…’


अभिनेत्री नुसरत जहाँ (Nusrat Jahan) अनेक कारणांमुळे चर्चेत असते. ख्रिसमसच्या निमित्ताने तिने चाहत्यांना एक छोटीशी ट्रीट दिली आहे. काही काळापूर्वी तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून आपला मुलगा ईशानची पहिली झलक चाहत्यांना दाखवली होती. त्याचवेळी नुसरतने तिच्या मुलाचा एक गोंडस फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ती एका छोट्या सॅन्टाक्लॉजसोबत दिसत आहे. फोटोसोबतच तिने सर्व चाहत्यांना ख्रिसमसच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

नुसरत जहाँने मुलाचा फोटो केला शेअर
नुसरतला तिच्या चाहत्यांना कसे खूश करायचे आणि आश्चर्यचकित करायचे हे माहित आहे. खास दिवशी तिने मुलगा ईशानचा एक क्यूट फोटो शेअर करून सर्वांचा दिवस खास बनवला. फोटोमध्ये नुसरतच्या हातात तिचे लहान बाळ आहे, ज्याला तिने सॅन्टाक्लॉजसारखे कपडे परिधान केले आहेत. फोटोत ईशानचा चेहरा लपलेला आहे, पण आई-मुलाचे प्रेम स्पष्टपणे दिसत आहे. या फोटोला आतापर्यंत ५१ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

फोटो शेअर करत नुसरतने लिहिले की, “हा फक्त एक सीझन नाही, तर एक भावना आहे. हा ख्रिसमस तुम्हा सर्वांसाठी आनंद, शांती, आशा आणि प्रेम घेऊन येवो. मेरी ख्रिसमस.” ख्रिसमसच्या निमित्ताने नुसरतने तिची खोली छान सजवली आहे. फोटोत ती जमिनीवर बसली आहे, तिच्या मागे लाईट लावलेले ख्रिसमस ट्री दिसत आहे.

निखिल जैनशी केले लग्न
नुसरत जहाँने २०१९ मध्ये बिझनेसमन निखिल जैनसोबत लग्न केले होते. लग्नानंतर ती आणि निखिल जैन जास्त काळ एकत्र राहू शकले नाहीत. दोघांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. निखिलपासून वेगळे झाल्यानंतर ती बंगाली अभिनेता यश दासगुप्तासोबत रिलेशनशिपमध्ये आली. ईशानच्या जन्मानंतर अनेकांनी मुलाच्या वडिलांवरही प्रश्न विचारले होते.

पण काही वेळाने नुसरतच्या मुलाचे जन्म प्रमाणपत्र व्हायरल झाले. ज्यामध्ये वडिलांचे नाव देबाशीष दासगुप्ता असे देण्यात आले. यशचे खरे नाव देबाशीष दासगुप्ता आहे.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!