जेव्हा भरगर्दीत सोनाक्षी सिन्हाला चुकीच्या जागेवर स्पर्श करू लागले काही लोक, ढसा ढसा रडली अभिनेत्री


अनेकदा आपण पाहतो की कलाकार त्यांच्या सुरक्षेसाठी खूप पैसा खर्च करतात. कारण गर्दीत त्यांच्यासोबत असभ्य गोष्टी होण्याची खूप जास्त शक्यता असते. सुरक्षेमध्ये झालेली थोडीशी चूक त्यांना आयुष्याचा धडा देते. असेच काहीसे बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हासोबत (Sonakshi Sinha) घडले होते. जेव्हा गर्दीतील काही लोकांनी तिला चुकीच्या उद्देशाने स्पर्श करण्यास सुरुवात केली.

चुकीच्या उद्देशाने केला स्पर्श
साल २०१० मध्ये ‘दबंग’ चित्रपटाच्या एका कार्यक्रमादरम्यान सोनाक्षी सिन्हाला पाहण्यासाठी खूप गर्दी जमली होती. ही गर्दी पुढे इतकी वाढली होती की, काही लोकांनी अभिनेत्रीला जबरदस्ती स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. दक्षिण मुंबईतील मंत्रालयाजवळील गांधी मैदानात ही घटना घडली. या घटनेने अभिनेत्री इतकी हादरली की ती तिथेच रडू लागली. (sonakshi sinha was touched unappropriately by some people in crowd)

करिअरमध्ये यश मिळवण्याचा प्रयत्न
सोनाक्षी सिन्हा एका सेलिब्रिटी कुटुंबातून आली आहे. इंडस्ट्रीत तिचे वडील शत्रुघ्न सिन्हा यांच्या नावाचा दबदबा आहे, याशिवाय ते मंत्रीही आहेत. त्यामुळे सोनावर नेहमीच दबाव राहिला आहे. अभिनेत्रीच्या अभिनयाचे लोकांनी खूप कौतुक केले आहे. जरी तिची चित्रपट कारकीर्द तिच्या वडिलांप्रमाणे यशस्वी झाली नाही. पण अभिनेत्री तिच्या प्रयत्नात व्यस्त आहे.

‘या’ अभिनेत्यासोबत जोडलं जातंय नाव
सोनाक्षी सिन्हाच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले, तर ती लवकरच हुमा कुरेशीसोबत ‘डबल एक्सएल’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत झहीर इकबाल देखील दिसणार आहे, ज्याच्यासोबत अभिनेत्रीचे नाव बरेच जोडले जात आहे. झहीर इकबालच्या कारकिर्दीबद्दल सांगायचे झाले तर, त्याने ‘नोटबुक’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!