Thursday, April 24, 2025
Home बॉलीवूड पंजाबी गाण्यावर धनश्री वर्माचा धमाकेदार डान्स, पुन्हा एकदा पाहायला मिळाली तिची एनर्जी

पंजाबी गाण्यावर धनश्री वर्माचा धमाकेदार डान्स, पुन्हा एकदा पाहायला मिळाली तिची एनर्जी

सोशल मीडिया आल्यामुळे अनेक चांगल्या आणि प्रतिभावान कलाकारांना एक चांगले आणि हक्काचे व्यासपीठच मिळाले आहे. सोशल मीडियाच्या जगात अनेक चांगले कलाकार त्यांच्या कला जगासमोर आणतात आणि लोकप्रिय होतात. या सोशल मीडियावरील असाच एक प्रसिद्धी आणि मोठा चेहरा म्हणजे धनश्री वर्मा. डान्सर, कोरिओग्राफर, फिटनेस ट्रेनर, डॉक्टर असणारी धनश्री सोशल मीडियावर खूपच लोकप्रिय आहे.

धनश्री नेहमी तिचे डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करतच असते. तिचे हे डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर आणि तरुणाईमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. तिचे प्रत्येक व्हिडिओ हे सोशल मीडियावर हिट होतातच. धनश्रीने नुकताच तिचा एक नवीन डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये ती पंजाबी गाण्यावर जबरदस्त नाचताना दिसत आहे. या व्हिडिओत तिच्या डान्स मुव्हज खूपच फास्ट असून पुन्हा भरपूर एनर्जी असलेला तिचा हा डान्स सध्या व्हायरल होत आहे.

धनश्रीला सोशल मीडियावर ४ मिलियनपेक्षा अधिक फॉलोवर्स असून तिचा हा नवीन व्हिडिओ आतापर्यंत १० लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला असून, हजारो कमेंट्स या व्हिडिओवर फॅन्सकडून येत आहेत. धनश्रीचा हा व्हिडिओ तिच्या प्रत्येक व्हिडिओसारखाच सर्वाना आवडत आहे. या व्हिडिओवर आलेल्या असंख्य कमेंट्सपैकी एका कमेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे, आणि ती कमेंट आहे तिचा पती आणि भारतीय क्रिकेट संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहलची. युझवेंद्रने धनश्रीच्या या व्हिडिओवर कमेंट करताना दोन रेड हार्ट असलेले ईमोजी पोस्ट केले आहेत.

मागच्या वर्षी २२ डिसेंबरला दिल्लीमध्ये धनश्रीने युझवेंद्रसोबत लग्न केले होते. धनश्री आणि युझवेंद्र यांना अनेकदा सोबत पाहिले जाते. धनश्री अनेकदा युझवेंद्रसोबत क्रिकेट सामन्यांसाठी इतर देशांच्या दौऱ्यावर जाताना दिसते.

नुकतेच धनश्री वर्माचे ‘ओये होये होये’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. गाण्यात धनश्री वर्मा आणि जस्सी गिल यांची जबरदस्त केमिस्ट्री दिसत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा