हॉटनेसचा तडका! रुबीना दिलैकच्या बिकिनीतील फोटोंनी वाढला इंटरनेटचा पारा; निक्की तांबोळीनेही केली कमेंट


बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी पडद्यावर एकदम सोज्वळ आणि संस्कारी स्त्रीची भूमिका साकारली आहे. मात्र, असे असले तरीही आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, कलाकारांचे पडद्यावरील आणि वैयक्तिक आयुष्य खूपच वेगळे आहे. यामध्ये एका अभिनेत्रीचा समावेश होतो, ती अभिनेत्री इतर कोणी नसून रुबीना दिलैक आहे. ‘छोटी बहू’ नावाने घराघरात पोहोचलेली रुबीना अधिकतर भारतीय लूकमध्येच दिसली आहे. तरीही सोशल मीडियावर ती पाश्चिमात्य लूकमध्येही तितकीच प्रसिद्ध आहे. ती सोशल मीडियावर आपले हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करत असते. असाच एक फोटो आता तिने शेअर केला आहे. या फोटोत ती बिकिनीमध्ये दिसत आहे. (Actress Rubina Dilaik Raises Temperature In Blue Bikini Photo Clicked By Abhinav Shukla)

रुबीनाने केला बिकिनीतील फोटो शेअर
आता रुबीनाने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून इंटरनेटचा पारा वाढला आहे आणि चाहत्यांना अक्षरश: घायाळ केले आहे. फोटोत रुबीनाने आकाशी रंगाची बिकिनी परिधान केली आहे आणि पूलमध्ये उतरत आहे.

सुट्ट्यांच्या प्रतीक्षेत आहे अभिनेत्री
फोटो शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, “सुट्ट्यांच्या प्रतीक्षेत आहे. एक बीच, बिकिनी आणि काही फोटो.” यासोबतच तिने हेही सांगितले आहे की, तिचा हा फोटो पती अभिनव शुक्लाने काढला आहे. अवघ्या ४ तासांच्या आत ४ लाखांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत.

चाहत्यांच्या प्रतिक्रिया
रुबीनाचा हा ग्लॅमरस अंदाज चाहत्यांना भलताच आवडला आहे. तिच्या या फोटोवर चाहत्यांसोबत कलाकारही कमेंट्स करत आहेत. अभिनेत्री निक्की तांबोळीने फायर इमोजी पोस्ट केल्या आहेत. दुसरीकडे एका युजरने कमेंट करत लिहिले की, “ओहएमजी, हॉटनेस ओव्हरलोडेड.” दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “बास आता माझा फोन ब्लास्ट झाला.” याव्यतिरिक्त अनेकांनी तिला “डीवा” आणि “क्वीन” म्हटले आहे.

रुबीनाची कारकीर्द
रुबीनाच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर ती प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने ‘छोटी बहू’ आणि ‘शक्ति: अस्तित्व के एहसास की’ या मालिकांमधून चाहत्यांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे. रुबीनाने ‘बिग बॉस १४’मध्ये भाग घेतला होता. या स्पर्धेचे विजेतेपद तिने पटकावले होते. या शोनंतर तिच्या लोकप्रियतेमध्ये कमालीची वाढ झाली.


Leave A Reply

Your email address will not be published.