Friday, December 27, 2024
[aioseo_breadcrumbs]

धनश्री वर्मा बनली ‘परम सुंदरी’, आयपीएलपूर्वी चाहत्यांना दिले खास सरप्राईझ

डान्सर आणि यूट्यूबर धनश्री वर्मा ही सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. धनश्री सध्या तिचा पती युझवेंद्र चहलसोबत दुबईत आहे. आयपीएल २०२१ चे उर्वरित सामने युएईत होणार आहेत. हे सामने १९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहेत. हे सामने सुरू होण्याअगोदर सर्व खेळाडू आणि त्यांच्या परिवारातील सदस्य तेथेच क्वारंटाईनमध्ये राहिले आहेत. चहलची पत्नी धनश्री वर्मा ही सतत तिचे डान्स व्हिडिओ शेअर करत असते. अलीकडेच तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यासह तिने चाहत्यांना खास सरप्राईझ दिले आहे. यामधून ती एक मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहे.

क्रिती सेननच्या ‘मिमी’ या चित्रपटातील ‘परम सुंदरी’ या गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडिओ शेअर करणार आहे. त्यामुळे चाहते तिच्या व्हिडिओवर प्रचंड लाईक्सचा पाऊस पाडण्यासाठी सज्ज झाले आहेत.

धनश्री वर्माने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याचबरोबर लिहिले की, “बॉलिवूड आता बराच वेळ झाला आहे. आयपीएलला जाण्यापूर्वी काही सुपर क्विक शूट केले. गुरुवारी नवीन व्हिडिओ येत आहे.”

अशाप्रकारे धनश्री वर्माने जाहीर केले आहे की, ती एक नवीन डान्स व्हिडिओ घेऊन येत आहे. चाहतेही या व्हिडिओवर खूप कमेंट करत आहेत. चाहत्यांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया देखील दिली आहेत. एका चाहत्याने प्रतिक्रिया देत लिहिले की, “जो धनश्री से जले जरा साइड से चले.” एका चाहत्याने विचारले की, “युजी कसा आहे?”

धनश्री वर्मा ही एक प्रसिद्ध नृत्यांगना आणि नृत्यदिग्दर्शिका आहे. धनश्री एक यूट्यूब चॅनेल देखील चालवते. ज्यावर ती तिचे डान्स व्हिडिओ शेअर करते. धनश्री वर्मा ही एक डॉक्टर आहेत. धनश्री वर्माने सोशल मीडियावर युझवेंद्र चहलसोबत अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत, जे चांगलेच पसंत केले गेले आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जेव्हा भारताबद्दल परदेशी होस्टने ऐश्वर्याला विचारला ‘हा’ प्रश्न; अभिनेत्रीनेही दिले होते सडेतोड प्रत्युत्तर

-‘एकेकाळी टॅक्सीमध्ये बसणे अभिमानाची गोष्ट होती’, अनिल कपूर यांनी ‘त्या’ दिवसांची काढली आठवण

-तब्बल ३० वर्षानंतर अजय देवगणने रिक्रिएट केला त्याचा ‘सिग्नेचर स्टंट’; ट्रकवर केली जबरदस्त ऍक्शन

हे देखील वाचा