एकदम कडक! युझवेंद्र चहलची पत्नी धनश्रीने चाहत्यांना शिकवला ‘सपने में मिलती है’ गाण्यावर डान्स, थ्रोबॅक व्हिडिओ व्हायरल

Dhanashree verma's dance video viral on social media


भारतीय क्रिकेट संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहलची पत्नी आणि कोरिओग्राफर धनश्री वर्मा ही सोशल मीडियावर खूपच लोकप्रिय झाली आहे. तिचे अनेक डान्स व्हिडिओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते. त्यामुळे या दिवसात तिच्या फॅन फॉलोविंगमध्ये कमालीची वाढ झाली आहे. सध्या धनश्री तिच्या एका डान्स व्हिडिओमुळे सर्वत्र चर्चित आहे. तिचा हा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावरील तिच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे. या व्हिडिओमधील तिच्या डान्स स्टेप्स सर्वांना खूपच आवडल्या आहेत. तिच्या या व्हिडिओवर अनेक कलाकार देखील कमेंट करत आहेत.

या लॉकडाऊनच्या दरम्यान धनश्रीचा एका जुना डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती तिच्या चाहत्यांसाठी ‘सपने में मिलती है’ या गाण्यावर डान्स स्टेप्स शिकवताना दिसत आहे. तिचा हा डान्स तिच्या डान्स चाहत्यांना खूपच आवडला आहे. या आधी तिने अनेक गाण्यांवर डान्स करून व्हिडिओ शेअर केले होते. तिच्या प्रत्येक व्हिडिओला सोशल मीडियावर भरभरून पसंती मिळत असते.

धनश्री ही व्यवसायाने डॉक्टर आहे. तसेच ती कोरीओग्राफर देखील आहे. यातून तिचे डान्स प्रती असलेले प्रेम दिसून येते. सोशल मीडियावर तिचा कोणताही व्हिडिओ शेअर होता क्षणीच व्हायरल होत असतो.

धनश्रीने 2020‌‌ च्या लॉकडाऊन दरम्यान युझवेंद्र चहलसोबत लग्न केले आहे. लॉकडाऊनमुळे जवळच्या काही नातेवाईक आणि मित्रांच्या उपस्थितीत त्यांचा विवाह सोहळा पार पाडला. त्यांच्या लग्नानंतर धनश्रीच्या लोकप्रियतेत खूप वाढ झाली असल्याची दिसून येते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-पवन सिंगच्या बाथरूम सीन असलेल्या ‘या’ गाण्याने अर्ध्या तासातच ओलांडला ६ लाख व्ह्यूजचा टप्पा

-पिवळ्या ड्रेसवर थिरकली ‘देसी क्वीन’, स्वत:च्या घरीच केला नुकत्याच रिलीझ झालेल्या गाण्यावर शानदार डान्स

-लग्नाच्या एकाच आठवड्यानंतर पाहायला मिळाले सुगंधा मिश्राचे वेगळेच रूप, पती संकेत भोसलेने व्हिडिओ शेअर करत आणलं समोर


Leave A Reply

Your email address will not be published.