लग्नाच्या एकाच आठवड्यानंतर पाहायला मिळाले सुगंधा मिश्राचे वेगळेच रूप, पती संकेत भोसलेने व्हिडिओ शेअर करत आणलं समोर

Sugandha Mishra and sanket Bhosale's after marriage video viral on Instagram


सिंगर आणि कॉमेडियन सुगंधा मिश्रा आणि संकेत भोसले हे काही दिवसांपूर्वी विवाहबंधनात अडकले आहेत. 26 एप्रिल रोजी दोघांनी लग्न केले आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. सुगंधा आणि संकेतच्या लग्नाच्या एक आठवड्यानंतरचा एक व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये सुगंधाचं वेगळंच रूप पाहायला मिळाले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या संख्येने व्हायरल होताना दिसत आहे.

कॉमेडियन संकेत भोसलेने नुकताच त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही खदखदून हसाल. हा व्हिडिओ शेअर करून त्याने सांगितले आहे की, “सुगंधा किती काळजी घेणारी पत्नी आहे.”

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, संकेत बेडवर झोपलेला असतो. त्यावेळी सुगंधा तिथे येते आणि त्याला गुड मॉर्निंग म्हणते. हातात चहाचा कप घेऊन ती संकेतला विचारते की, ‘तुला चहा प्यायचा आहे का?’ संकेत हो म्हणत उत्तर देतो. त्यांनतर ती विचारते लाईट की स्ट्राँग. तो म्हणतो की स्ट्राँग. यावर सुगंधा बोलते की, ‘चहा पावडर दोन चमचे आणि दूध एकदम थोडंसं टाक जा कर.’ तिचे हे बोलणे ऐकून तो सुगंधाकडे बघतच राहतो. हा व्हिडिओ शेअर करून त्याने लिहिले की, ‘लग्नानंतर.’

त्यांच्या हा मजेशीर व्हिडिओवर खूप प्रतिक्रया येत आहेत. त्याचे मित्र त्याला कमेंट करून म्हणत आहेत की, “लग्नानंतर असंच होत असत.” तरीही काहीजण हसण्याची ईमोजी पोस्ट करत आहेत. या आधी देखील संकेतने त्यांचा एक व्हिडिओ शेअर केला होता. हा व्हिडिओ त्याच्या लग्नाच्या दिवशीचा होता. यामध्ये सुगंधा आणि संकेत दोघेही कारमध्ये बसलेले दिसत आहेत. हा व्हिडिओ शेअर करून त्याने लिहिले होते की,”हॅलो मिसेस भोसले.”

सुगंधा आणि संकेतचे लग्न कोरोना निर्बंधामुळे त्यांच्या काही जवळच्या नातेवाईक मध्ये पार पडले होते. तरीही सगळ्या रीतिरिवाजानुसार त्यांचा विवाह सोहळा पार पडला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-साडीमध्ये अभिनेत्रीच्या मनमोहक अदांनी लावले सर्वांनाच वेड! चाहत्यांसह कलाकारही झाले अमृता खानविलकर फिदा

-भोजपुरी अभिनेत्रीने केला दीपिकाच्या ‘दम मारो दम’ गाण्यावरील व्हिडिओ शेअर, एक्सप्रेशन्स पाहून चाहत्यांनी केले कौतुक

-एकेकाळी सुंदर चेहरा नाही म्हणून नाकारली गेली होती इरफान खानची अभिनेत्री, आता बॉलिवूडमध्येे वाजवतेय डंका, वाढदिवशी लिहिली भावुक पोस्ट


Leave A Reply

Your email address will not be published.