भोजपुरी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार पवन सिंग हा एक नावाजलेला अभिनेता आहे. त्याचे कोणतेही गाणी येत्या क्षणीच यशाचे शिखर गाठतात. पवन सिंगचे नुकतेच एक गाणे प्रदर्शित झाले आहे. ‘मिठा मिठा बथे कमरिया’ हे त्याचे गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्याने पुरती धमाल केली आहे.
या गाण्याची केवळ 1 तासातील लोकप्रियता बघून असा अंदाज वर्तवला जात आहे की, हे गाणे भोजपुरी गाण्याचे सगळे रेकॉर्ड मोडणार आहे. या गाण्याला मंगळवारी (4 मे) प्रदर्शित केले आहे. केवळ अर्ध्या तासातच या गाण्याला 6 लाखांपेक्षाही जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. आतापर्यंत या गाण्याने २६ लाख व्ह्यूजचा टप्पाही ओलांडला आहे.
माँ अम्मा फिल्म्स या यूट्यूब चॅनेलवर पवन सिंगचे गाणे रिलीझ झाले आहे. पवन सिंगने त्याच्या मधूर आवाजात हे गाणे गायले आहे. या गाण्यातील बाथरूम सीन प्रेक्षकांना खूपच आवडला आहे. तसेच पवनचा या गाण्यातील परफॉर्मन्स देखील सर्वांना आवडला आहे. प्रकाश बारुद यांनी या गाण्याच्या लिरिक्स लिहिले आहेत. तसेच छोटे बाबा यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. ऋतिकने या गाण्याला डान्स स्टेप्स दिल्या आहेत. रवी पंडित यांनी या गाण्याचे दिग्दर्शन केले आहे.
हे गाणे प्रदर्शित होण्याच्या एक दिवस आधी म्हणजेच काल या गाण्याच्या टिझर प्रदर्शित झाला होता. टिझरला देखील जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. आज या पूर्ण गाण्याला रिलीझ केले आहे. या गाण्याला भन्नाट प्रतिसाद मिळाला आहे.
याआधी देखील पवन सिंगची अनेक गाणी प्रदर्शित झाली आहेत. त्यांना देखील भोजपुरी प्रेक्षकांनी जबरदस्त प्रतिसाद दिला होता. यामध्ये ‘बबन तेरे रंग मे हैं’, ‘लॉली पॉप लागेलू’, ‘कुवरियो गंगा नहालीया है’ यांसारख्या अनेक सुपरहिट गाण्यांचा समावेश होतो.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-पैशांसाठी केले तिने ‘कांटा लगा’ या वादग्रस्त गाण्यामध्ये काम; एकाच रात्रीत बनली स्टार