Thursday, April 18, 2024

धनुषचा कॅप्टन मिलर पडला सगळ्यांवर भारी, पहिल्याच दिवशी केली ‘एवढी’ कमाई

साउथ सुपरस्टार धनुषचे (Dhanush) उत्तर भारतातही मोठे फॅन फॅालोईंग आहे. धनुषच्या चित्रपटांची त्याचे फॅन आतुरतेने वाट पहात असतात. शुक्रवारी धनुषचा नवा चित्रपट कॅप्टन मिलर(Captain Miller) प्रदर्शित झाला. चित्रपटाला प्रक्षकांचा चांगला प्रतीसाद मिळत आहे. बॅाक्स ऑफिसवर (Box Office) पहिल्या दिवशी प्रदर्शित झालेल्या इतर चित्रपटांमध्ये हा चित्रपट आपली पकड कायम ठेवण्यात यशस्वी ठरला.

२०२४च्या पहील्याच शुक्रवारी ‘मेरी क्रिसमस’,’आयलान’, ‘गुंटूर कारम’ आणि ‘हनुमान’ यासारखे अनेक मोठे चित्रपट प्रदर्शित झाले. यासारख्या मोठ्या चित्रपटांमध्ये धनुषचा कॅप्टन मिलर किती यशस्वी झाला चला पाहूया.

कॅप्टन मिलरची फॅन्स मध्ये क्रेझ
संपुर्ण भारतभर रिलीज झालेला कॅप्टन मिलर तब्बल १६०० स्क्रीनवर रिलीज करण्यात आला आहे. चित्रपटाला पहिल्याच दिवशी प्रक्षकांचा मोठ्या संख्येने प्रतीसाद मिळाला. फॅन्स बरोबरच समीक्षकही चित्रपटाची प्रशंसा करत आहे.

फस्ट डे फस्ट शो हिट
एका रिपोर्टनुसार, पहिल्याच दिवशी चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन (Box Office collection) तब्बल ८.६५ करोड एवढे होते. विशेष म्हणजे याचित्रपटाचे कुठल्याही प्रकारचे प्रमोशन (झीरो प्रमोशन) करण्यात आले नव्हते. तरी सुध्दा चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

कॅप्टन मिलरची कथा
कॅप्टन मिलरही पिरीयड ड्रामा (Period Drama) फिल्म आहे. हा चित्रपट १९३० पार्श्वभूमीवर आधारीत आहे. ज्याची कथा एका विद्रोही नेत्याच्या (धनुष) अवतीभवती फिरते.

स्टार कास्ट
चित्रपटात धनुष सोबत शिवा राजकुमार, प्रियांका मोहन, सुदीप कीशन, विनोथ किशन, नासर ही कलाकार मंडळी आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचे पुण्यात निधन, संगीत विश्वावर शोककळा
मायकेल जॅक्सनची कहाणी उतरणार रुपेरी पडद्यावर, ‘हा’ अभिनेता साकारणारा मुख्य भूमिका

हे देखील वाचा