दाक्षिणात्य अभिनेता धनुष (Dhanush) सध्या चर्चेत आहे. विशेष म्हणजे, तो त्याच्या चित्रपटांमुळे नाही तर त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. खरं तर, मदुराईचे एक जोडपे बऱ्याच काळापासून अभिनेत्याला त्यांचा बायोलॉजिकल मुलगा म्हणून दावा करत आहेत. आता धनुष आणि त्याचे वडील कस्तुरी राजा यांनी या जोडप्याविरोधात कायदेशीर नोटीस पाठवली आहे. धनुष हा त्यांचा मुलगा आहे म्हणणे या जोडप्याने थांबवावे, असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. तसेच नोटीसमध्ये या जोडप्याला पत्रकार परिषदेत हे निवेदनही देण्यास सांगण्यात आले आहे.
धनुषच्या वकिलांनी दिला इशारा
नोटीसमध्ये धनुषचे वकील एस हाजा मोहिद्दीन गिष्टी यांनी जोडप्याला असे दावे थांबवण्यास सांगितले आहे. गिष्टी यांनी म्हटले आहे की, “माझे क्लायंट तुम्हा दोघांना त्यांच्याविरुद्ध खोटे आणि बदनामीकारक आरोप करण्यापासून दूर राहण्यास सांगत आहेत. तुम्ही तसे न केल्यास, माझे क्लायंट त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आणि तुम्हाला पुढे जाण्यापासून रोखण्यासाठी न्यायालयात अपील करण्यास बांधील असतील. तुमच्या दोघांवर बदनामी आणि त्यांच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवल्याबद्दल खटला दाखल केला जाईल.” (dhanush issues legal notice against madurai couple asks apology and demands rs 10 crores as compensation)
अट न पाळल्याबद्दल १० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा
धनुष आणि त्याच्या वडिलांनी या जोडप्याला एक प्रेस स्टेटमेंट जारी करण्यास सांगितले आहे, ज्यामध्ये त्यांना अभिनेत्यावर खोटे आरोप केल्याबद्दल माफी मागावी लागेल. नोटीसनुसार, असे न केल्यास या जोडप्याला मानहानीसाठी १० कोटी रुपये नुकसानभरपाई म्हणून भरावे लागतील. अभिनेत्याने यापूर्वी म्हटले होते की, हे प्रकरण त्याच्याकडून खंडणी घेण्याच्या प्रयत्नात करण्यात आले होते.
मदुराई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने कथिरेसनची याचिका फेटाळल्यानंतर मद्रास उच्च न्यायालयाने धनुषविरुद्ध नोटीस जारी केली होती. कथिरेसन आणि मीनाक्षी यांनी दावा केला होता की, धनुष त्यांचा तिसरा मुलगा आहे आणि तो चित्रपट उद्योगात करिअर करण्यासाठी त्यांचे मूळ गाव सोडून चेन्नईला गेला होता.
अनेक प्रोजेक्ट्समध्ये दिसणार अभिनेता
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर धनुष शेवटचा तामिळ चित्रपट ‘मारन’ मध्ये दिसला होता. त्याच्याकडे नेटफ्लिक्सच्या ‘द ग्रे मॅन’सह अनेक चित्रपट आहेत. यात ख्रिस इव्हान्स आणि रायन गोसलिंगसह हॉलिवूड स्टारकास्ट देखील आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा