Sunday, May 19, 2024

ऐश्वर्या रजनीकांतने बदलला तिचा ट्विटर आणि इंस्टाग्राम हँडल बायो, सोशल मीडियावरून हटवले धनुषचे नाव

दाक्षिणात्य अभिनेता धनुष आणि त्याची एक्स पत्नी ऐश्वर्या रजनीकांत यांनी त्यांच्या १८ वर्षांच्या वैवाहिक जीवनाच्या समाप्तीची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले. साऊथच्या या प्रसिद्ध जोडप्याने त्यांच्या घटस्फोटाची माहिती देणारे संयुक्त निवेदनही जारी केले होते. त्याचवेळी आता त्यांचे नाते संपुष्टात आल्यानंतर ऐश्वर्या रजनीकांतने अभिनेता धनुषचे नाव तिच्या सोशल मीडिया हँडलवरून हटवले आहे.

अलीकडेच, धनुषने (Dhanush) ९ वर्षांनंतर दिग्दर्शनात परतल्याबद्दल त्याची एक्स पत्नी ऐश्वर्याचे (Aishwarya Rajinikanth) अभिनंदन करणारी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने ऐश्वर्याला मैत्रीण असे संबोधले आहे. धनुषच्या या पोस्टनंतर काही दिवसांनी ऐश्वर्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून धनुषचे नाव हटवल्याचा अंदाजही लोक लावत आहेत. धनुषचे नाव काढून टाकल्यानंतर ऐश्वर्याने आता तिचे ट्विटर हँडल बदलून ऐश्वर्या रजनीकांत असे केले आहे.

याच्या काही आठवड्यांपूर्वी ऐश्वर्याने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचा एक्स पती धनुषचे नाव देखील काढून टाकले होते. धनुषचे नाव तिच्या बायोमधून काढून टाकल्यानंतर तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटचे नाव ऐश्वर्या रजनीकांत असे ठेवले. जरी तिचे युजरनेम अद्याप ऐश्वर्या आर धनुष आहे. गेल्या आठवड्यातच धनुषने ट्विटरवर ऐश्वर्याला ‘पायनी’ या नवीन गाण्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. ऐश्वर्याने दिग्दर्शित केलेले हे गाणे गुरुवारी हिंदी, तेलुगू, मल्याळम आणि तमिळ या चार भाषांमध्ये प्रदर्शित झाले.

ऐश्वर्याच्या गाण्याची तामिळ लिंक शेअर करत धनुषने ट्वीट केले की, “माझी मैत्रिण ऐश्वर्या आर धनुष हिचे संगीत व्हिडिओसाठी अभिनंदन. देव आशीर्वाद देवो.” धनुषच्या या ट्वीटला उत्तर देताना ऐश्वर्या म्हणाली होती की, “धनुष धन्यवाद.” विशेष म्हणजे धनुष आणि ऐश्वर्या वेगळे झाल्यानंतर सोशल मीडियावर त्यांचा हा पहिलाच संवाद होता. याने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.

विशेष म्हणजे यावर्षी १७ जानेवारीला धनुष आणि ऐश्वर्याने एकमेकांच्या विभक्त झाल्याची माहिती देऊन सर्वांना आश्चर्यचकित केले .त्यांचे नाते संपुष्टात आणत, दोघांनी एक संयुक्त निवेदन जारी केले. “आम्ही १८ वर्षे मित्र, जोडपे, पालक आणि एकमेकांचे शुभचिंतक म्हणून एकत्र राहिलो. आज आपण अशा ठिकाणी उभे आहोत जिथे आपले मार्ग वेगळे होतात. आम्ही एक जोडपे म्हणून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे आणि आम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी वेळ काढला आहे.” गेल्या १८ वर्षांपासून हे जोडपे एकत्र होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा- 

 

हे देखील वाचा