‘इंडियन आयडल १२’च्या मंचावर दिलीप कुमारांच्या आठवणीत धरम पाजींना अश्रू अनावर; म्हणाले, ‘अजूनही सावरलो नाही’


काही कलाकार असे असतात, जरी ते आज या जगात नसले, तरी त्यांच्या कामाचा सुगंध आजही सर्वत्र दरवळतो. त्यांच्या कामाच्या रुपाने ते प्रेक्षकांच्या मनात आजही जिवंत आहेत. यातीलच एक कलाकार म्हणजे ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार. त्यांच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील अनेक कलाकार त्याच्या घरी गेले होते आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली होती. धर्मेंद्र यांनी दिलीप कुमार सोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करून केले होते. यासोबतच त्यांनी लिहिले होते की, आज मी माझ्या भावाला गमावले आहे. आता धर्मेंद्र हे ‘इंडियन आयडल १२’ या शोमध्ये दिसणार आहेत.

या एपिसोडमध्ये दिलीप कुमार यांना ट्रिब्यूट दिले जाणार आहे. या शोचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. ज्यामध्ये धर्मेंद्र असे म्हणतात की, “मी या धक्क्यातून अजूनही सावरलो नाहीये.” (Dharmebdra can’t stop his tears while remembaring Dilip kumar on indian ideol 12 stage)

या प्रोमोमध्ये आपण पाहू शकता की, सगळे स्पर्धक दिलीप कुमार यांना श्रद्धांली अर्पण करताना दिसत आहेत. हे पाहून धर्मेंद्र त्यांचे अश्रू आवरू शकले नाही. ते म्हणतात की, “आम्ही अजूनही या धक्क्यातून बाहेर आलो नाहीत. मी तरी अजून सावरलेलो नाहीये. तो माझा जीव होता.”

धर्मेंद्र पाजी पुढे म्हणतात की, “मी माझ्या आयुष्यातील पहिला चित्रपट त्यांचाच पाहिला होता. त्यांना पाहून मला असे वाटले की, मी देखील चित्रपटसृष्टीत जाईल आणि मला देखील एवढेच प्रेम मिळेल. माझी त्यांच्याशी भेट देखील झाली. मला देखील खूप प्रेम मिळाले. खूप प्रेम जे मी सांगू देखील शकत नाही.”

“मी आजही म्हणतो की, अनेक महान कलाकार आहेत, परंतु दिलीप कुमार यांच्या पुढे मला कोणीही दिसत नाही. मी फक्त एवढीच श्रद्धांजली वाहतो की, त्यांच्या नशिबात स्वर्ग असो,” असेही ते पुढे म्हणाले. हा व्हिडिओ शेअर करून कॅप्शन दिले आहे की, “धर्मेंद्र यांना लेजेंडरी अभिनेता दिलीप कुमार यांच्या आठवणीत अश्रू अनावर झाले.”

धर्मेंद्र यांनी दिलीप कुमार यांच्या आठवणीत एक ट्वीट केले होते. त्यांनी लिहिले होते की, “मित्रांनो दिलीप कुमार यांच्या निधनाने आपल्या सर्वांना भावुक केले आहे. ते एक सर्वोत्कृष्ट कलाकार आणि एक चांगले व्यक्ती होते. त्यांना ही श्रद्धांजली. ते गेले, पण त्यांच्या आठवणी कधीच जायला नाही पाहिजे.”

प्रेक्षक आता ‘इंडियन आयडल’च्या आगामी एपिसोडची वाट पाहत आहेत. या शोमध्ये स्पर्धक दिलीप कुमार यांची गाणी गाताना दिसणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-टायगर श्रॉफची बहीण कृष्णाने सांगितला तिचा फिटनेस मंत्र; म्हणाली, ‘सातत्य हीच तुमच्या यशाची…’

-वाढदिवशी मिळालेल्या शुभेच्छांसाठी कॅटरिनाने फोटो शेअर करत मानले सर्वांचे आभार; म्हणाली, ‘तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल…’

-केवळ ५०० रुपये घेऊन मुंबई आलेल्या रवी किशनचे आज आहे १२ बेडरूमचे मोठे घर; बराच संघर्षमय होता त्याचा सिनेप्रवास


Leave A Reply

Your email address will not be published.