ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी आपल्या कारकीर्दीत अनेक सुपरहिट चित्रपटे दिली आहेत. त्यांनी चित्रपटातील आपली भूमिका उत्तमरित्या साकारल्या होत्या. त्यांच्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणजे ‘ऐलान-ए-जंग’ होय. या चित्रपटाचे संवाद लेखन जबरदस्त केले होते. या चित्रपटात जया प्रदा, दारा सिंग आणि सदाशिव अमरापूरकर यांसारखे दिग्गज कलाकार होते. १८ ऑगस्ट, १९८९ रोजी रिलीझ झालेल्या या चित्रपटाने ३२ वर्षांचा प्रवास पूर्ण केला आहे. पण त्यांच्या जबरदस्त ऍक्शनमुळे सिनेमाप्रेमींना हा चित्रपट अजूनही आवडतो. या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी सांगितले होते की, प्रेक्षकांना हा चित्रपट अजूनही खूप आवडतो.
धर्मेंद्रबद्दल मोठी क्रेझ
‘एलन-ए-जंग’ चे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी गेल्या वर्षी या चित्रपटाला ३१ वर्षे पूर्ण झाल्यावर चित्रपटाशी संबंधित काही आठवणी सांगितल्या होत्या. ते म्हणाले होते की, “‘हुकुमत’ हा चित्रपट सुपरहिट झाल्यावर, ‘ऐलान-ए-जंग’ला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला होता. धर्मेंद्रची जादू अशी होती की, दिल्ली आणि मुंबईचे प्रेक्षक वेडे झाले होते. दिल्लीत चाहते इतके वेडे झाले होते की, काही चाहत्यांनी चित्रपटाची रील पाहण्यासाठी रील बॉक्स हिसकावून घेतला होता.”
धर्मेंद्र यांचा ‘हुकुमत’ हा चित्रपट जबरदस्त हिट झाला होता. यानंतर जेव्हा ‘ऐलान-ए-जंग’ रिलीझ झाला, तेव्हा बॉक्स ऑफिसवर प्रेक्षक तुटून पडले होते. ‘ऐलान-ए-जंग’ च्या ३२ व्या वर्षानिमित्त अनिल शर्मा यांनी ट्वीट करून चित्रपटाचे पोस्टर शेअर केले. त्याचबरोबर असेही लिहिले की, “वेळ खूप लवकर जातो.”
Time passes so fast https://t.co/erzx5tqtjS
— Anil Sharma (@Anilsharma_dir) August 17, 2021
धर्मेंद्रसोबत रोमँटिक सीन करणे होते कठीण
त्याचवेळी या चित्रपटाची नायिका जया प्रदा यांनी धर्मेंद्रबद्दल धक्कादायक खुलासा देखील केला होता. त्यांनी सांगितले होते की, “‘ऐलान-ए-जंग’ च्या शूटिंगदरम्यान धर्मेंद्रसोबत रोमँटिक सीनचे चित्रीकरण करताना स्थिती बिघडत होती. कारण जे ते रिहर्सलमध्ये करत असायचे, ते टेकमध्ये करत नव्हते. टेकमध्ये ते दुसरे काही करत असायचे.” या गोष्टीचा खुलासा जया प्रदा जेव्हा‘इंडियन आयडल १२’मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आल्या होत्या, तेव्हा त्यांनी हे मजेशीर पद्धतीने सांगितले होते.
जया घाबरायच्या धर्मेंद्रला
कॉमेडी अभिनेता कपिल शर्माच्या ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये ही जया यांनी सांगितले होते की, “धर्मेंद्र खूप परिपक्व आणि हुशार अभिनेता आहेत. पण ते खूप इश्कबाजी करायचे. धर्मेंद्रची ही सवय कधीकधी मला खूप घाबरवायची. तरी धर्मेंद्रची इश्कबाजी नेहमीच मर्यादित असायची.” जया प्रदा यांनी हे उत्तर दिल्यानंतर कपिलने त्यांना आणखी एक प्रश्न विचारला होता. तो असा की, त्यांच्या काळातील सर्वात फ्लर्ट करणारा अभिनेता कोण आहे?
सदाशिव अमरापूरकरांची भीती
‘ऐलान-ए-जंग’या चित्रपटाच्या यशात धर्मेंद्र आणि जया प्रदा यांची मोठी भूमिका होती. त्याचबरोबर चित्रपटाचे खलनायक सदाशिव अमरापूरकर यांचीही भूमिका काही कमी नव्हती. सदाशिव चित्रपटगृहात धर्मेंद्रना बेड्या ठोकून संवाद बोलायचे, तेव्हा त्यांच्या डोळ्यांची आणि आवाजाची भीती चित्रपटगृहामध्ये दहशत पसरवायची. त्याचवेळी, धर्मेंद्र यांनी त्यांच्या रफ-टफ शैलीमध्ये ऍक्शन भूमिका बजावून चित्रपट यशस्वी केला.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-