‘चक्की पिसिंग, पिसिंग अँड पिसिंग’, धर्मेंद्र यांचा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर झाला व्हायरल


कलाकार त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात फिटनेसबाबत खूपच सजग आणि शिस्तबद्ध दिसतात. ते नेहमीच त्यांच्या दैनंदिन आयुष्यात व्यायामाला महत्व देत तो न चुकता करण्यासाठी बांधील असतात. फिटनेसबद्दल असलेली जागरूकता ही फक्त आजच्या पिढीतील कलाकारांमध्ये आहे, असे अजिबात नाही. जुन्या दिग्गज कलाकारांमध्ये देखील फिटनेसबाबत खूपच प्रेम दिसून येते. आता बॉलिवूडचे हिमॅन असलेल्या धर्मेंद्र यांचेच बघा ना. वयाच्या ८६ व्या वर्षी देखील धर्मेंद्र यांचा फिटनेस आजच्या काळातील भल्याभल्या तरुणांना लाजवणारा आहे. ते नेहमीच त्यांच्या फिटनेसचे व्हिडिओ सोशल मेडियावरून शेअर करत फॅन्सला सुखद धक्का देत असतात.

नुकताच धर्मेंद्र यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला असून, हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना आश्चर्य तर वाटतच सोबतच धर्मेंद्र यांचे व्हिडिओ पाहून तुफान कौतुक देखील केले जात आहे. या व्हिडिओमध्ये धर्मेंद्र हे सायकल चालवताना दिसत आहेत. या सायकलच्या चाकाला एक गिरणी जोडलेली दिसत असून, त्यात काही धान्य ठेवण्यात आले आहे. ते धान्य धर्मेंद्र सायकल चालवत त्या गिरणीतील दळण दळताना दिसत आहे.

धर्मेंद्र यांनी हा व्हिडीओ इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करताना जे कॅप्शन दिले आहे ते वाचून सगळ्यांनाच हसू आल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी लिहिले, “सायकलिंग, सायकलिंग, सायकलिंग आणि चक्की पिसिंग, पिसिंग अँड पिसिंग”. तुमच्या लक्षात आलेच असेल हा धर्मेंद्र यांच्या सुपरहिट शोले सिनेमातील संवाद आहे. या व्हिडिओमध्ये ते व्यायामासोबतच दळण करण्याचे देखील काम करत आहे. त्यांचा हा व्हिडिओ नेटकऱ्यांना तुफान आवडत असून, ते त्यांचे कौतुक करताना थकत नसल्याचे कमेंट्समध्ये दिसत आहे.

धर्मेंद्र यांच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास ते लवकरच करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ सिनेमातून बऱ्याच काळानंतर ते मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. याशिवाय ते त्यांच्या होम प्रॉडक्शनच्या ‘अपने २’ मध्ये देखील दिसणार आहेत.

हेही वाचा :

शाहिदच्या बहुचर्चित ‘जर्सी’ सिनेमाचे प्रदर्शन रद्द, कोरोनाच्या वाढत्या धोक्यामुळे चित्रपटाच्या टीमचा निर्णय

सलमान खानच्या ‘सुलतान’ चित्रपटासाठी ‘ही’ अभिनेत्री होती पहिली पसंती, खुद्द अभिनेत्यानेच केला खुलासा

ट्विटरवर ‘अतरंगी रे’ विरोधात मोहीम, अक्षय-सारा अन् धनुषच्या चित्रपटावर ‘या’ गोष्टीला प्रोत्साहन दिल्याचा आरोप


Latest Post

error: Content is protected !!