बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे त्यांना दक्षिण मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका जवळच्या सूत्राने सांगितले की, काही दिवसांपूर्वीच धर्मेंद्र यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. सूत्रांनी सांगितले की, धर्मेंद्र यांना अनेक दिवसांपासून पाठीचा त्रास होता, जो बराच वाढला आहे. मात्र सध्या ते बरे असल्याचे सांगण्यात येत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत सध्या सुधारणा होत असून, आता त्यांची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली आहे. त्यांना लवकरच डिस्चार्ज मिळू शकतो. सध्या या आजाराबाबत आणि रुग्णालयाबाबत अधिक माहिती दिली जात नाही. त्याचवेळी, जेव्हा धर्मेंद्र यांचा मुलगा सनी देओलला (Sunny Deol) त्याचे वडील रुग्णालयात असल्याची बातमी मिळाली, तेव्हा तो त्याच्या ‘सूर्यदेव” चित्रपटाचे शूटिंग सोडून मुंबईत आला आणि सध्या तो धर्मेंद्रसोबत रुग्णालयात आहे. (dharmendra hospitalized latest update about his health)
धर्मेंद्र ८६ वर्षांचे आहेत, त्यामुळे ते हळूहळू त्यांच्या आजारातून बरे होत आहेत. त्याचबरोबर धर्मेंद्र सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. त्यांच्या सोशल मीडियावर समोर आलेल्या बहुतेक व्हिडिओंमध्ये ते त्यांच्या फार्म हाऊसमध्ये दिसतात.
धर्मेंद्र यांच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर लवकरच २००७ मध्ये आलेल्या ‘अपने’ चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये दिसणार आहेत. त्याच वेळी, या ‘अपने २’ मध्ये धर्मेंद्र, त्यांचा नातू करण देओल (Karan Deol) त्यांची मुले सनी आणि बॉबी देओल (Bobby Deol) देखील दिसणार आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा