‘शाब्बास गं रणरागिणी!’ उधळणाऱ्या बैलाला हाकणाऱ्या शेतकऱ्याच्या लेकीचं अमोल कोल्हे यांनी केलं कौतुक

मनोरंजन विश्वात असे अनेक कलाकार आहे जे अभिनयाबरोबरच राजकारणातही आपला ठसा उमटवण्यात यशस्वी झाले आहेत. त्यापैकी एक असलेले ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारून घराघरात आपली ओळख निर्माण करणारे अभिनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe). अमोल कोल्हे सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असतात. ते नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरुन सोशल मीडियावर चर्चेत असतात. नुकताच त्यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामुळे ते जोरदार चर्चेचा विषय ठरत आहेत.

अमोल कोल्हे यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये बैलगाडी दिसत आहे. त्याच्याकडेने माणसं देखील दिसत आहेत. पण अचानक बैलगाडीचे बैल उधळतात. त्याचवेळी एक मुलगी न घाबरता त्या बैलाला हाताळताना दिसत आहे. हाच व्हिडिओ शेअर करत अमोल कोल्हे यांनी त्या मुलीचे तोंडभरून कौतुक केले आहे.

व्हिडिओ शेअर करत अमोल कोल्हे यांनी त्याला खास कॅप्शन देखील दिले आहे. जे सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. त्यांनी लिहिले की, “शाब्बास गं रणरागिणी! शिवजन्मभूमीच्या मातीतील शेतकऱ्याच्या लेकीही मागे नाहीत! जी मायेनं बैलपोळ्याला पुरणपोळी खाऊ घालते ती घाटात गाडा जुंपण्याची हिंमतही दाखवते!” अमोल कोल्हे यांनी ही पोस्ट आता सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. आतापर्यंत त्यांच्या या पोस्टला ७०० हून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

अमोल कोल्हे यांच्याबद्दल बोलायचे झाले, तर ते खासदार आहेत. तसेच ते डॉक्टर देखील आहे. परंतु त्यामध्ये त्यांचे जास्त मन न रमल्याने त्यांनी अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. त्यांनी अनेक मराठी चित्रपटात काम केले आहे. तसेच मालिकांमध्ये देखील काम केले आहे. त्यांनी ,‘स्वराज्य रक्षक संभाजी’, ‘राजा शिवछत्रपती’, ‘राज माता जिजाऊ’, ‘वीर संभाजी’ यांसारख्या मालिकेत काम केले आहे. ते त्यांच्या चाहत्यांमध्ये शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी लोकप्रिय आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

Latest Post