Sunday, June 8, 2025
Home बॉलीवूड हेमा मालिनी नाही, तर ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत काम करण्यासाठी धरम पाजींनी पाहिली होती १० वर्षे वाट

हेमा मालिनी नाही, तर ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत काम करण्यासाठी धरम पाजींनी पाहिली होती १० वर्षे वाट

हिंदी सिनेसृष्टीत अशी मोजकीच जोडपी आहेत, ज्यांनी आपल्या नात्याचे लग्नात रुपांतर करून ते शेवटपर्यंत टिकवण्यात यशस्वी ठरले आहेत. यामध्ये सर्वात प्रथम नाव घेतले जाते, ते म्हणजे ‘ड्रीमगर्ल’ हेमा मालिनी आणि अभिनेते धर्मेंद्र यांचे. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या प्रेमकथेची चर्चा आजही होताना दिसते. लग्नाच्या इतक्या वर्षानंतरही त्यांच्यामधील प्रेम कमी झाले नाही. मात्र, जिच्यासोबत चित्रपटात काम करण्याची धर्मेंद्र यांची इच्छा होती, ज्यासाठी त्यांनी अनेक वर्ष वाट पाहिली ती अभिनेत्री मात्र दुसरीच कोणीतरी होती. वाचून तुम्हालाही धक्का बसला ना, पण हेच खरे सत्य आहे. या लेखातून त्याच अभिनेत्रीबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

बॉलिवूडचे सुपरस्टार धर्मेंद्र (Dharmendra) आणि हेमा मालिनी (Hema Malini) यांची प्रेमकथा खूपच सुंदर आहे. हेमा मालिनींना पहिल्यावेळी पाहूनच धर्मेंद्र त्यांच्या सौंदर्यावर फिदा झाले होते. विवाहित असूनही ते हेमा मालिनी यांच्या प्रेमात पडले होते. मात्र, धर्मेंद्र यांच्या चित्रपटाची ‘ड्रीमगर्ल’ कोणीतरी दुसरीच होती, जिच्यासोबत काम करण्यासाठी त्यांना खूप वाट पाहावी लागली होती.

हेही पाहा- बाई वाड्यावर या’ बोलणाऱ्या निळू भाऊंनी लहान असताना स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता | Nilu Fule

याबाबतचा खुलासा खुद्द अभिनेते धर्मेंद्र यांनीच केला होता. एका मुलाखतीत बोलताना त्यांनी सांगितले होते की, त्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री साधनासोबत काम करण्यासाठी त्यांनी तब्बल १० वर्ष वाट पाहिली होती. हा किस्सा आहे १९६० मधील. एका चित्रपटासाठी साधनासोबत धर्मेंद्र यांची निवड करण्यात आली होती. मात्र, नंतर त्यांना या चित्रपटातून काढण्यात आले. हा चित्रपट होता ‘लव्ह इन शिमला.’ यानंतर तब्बल १० वर्षांनी ‘इश्क पर जोर नही’ चित्रपटात त्यांना या ड्रीमगर्लसोबत काम करण्याची संधी मिळाली.

मात्र, या एकाच चित्रपटात ते एकत्र काम करू शकले. यानंतर कधीही त्यांना ही संधी मिळाली नाही. कारण, लग्नानंतर साधनाने चित्रपटात काम करने बंद केले होते. असे म्हणतात की, साधना त्या काळातील लोकप्रिय अभिनेत्री होत्या. इतकेच नाही, तर प्रत्येकजण त्यांच्यासोबत चित्रपटात काम करण्यासाठी उत्सुक होता.

अभिनेते धर्मेंद्र यांच्याबद्दल बोलायचं झालं, तर त्यांनी आतापर्यंत ३०० हून अधिक सिनेमात काम केलं आहे. त्यांना ‘ही मॅन’ हा टॅग वयाच्या १९८७ साली ५२ व्या वर्षी मिळाला होता. तसेच ते १९६९ पर्यंत राजेश खन्ना सिनेसृष्टीत येईपर्यंत रोमँटिक हिरो म्हणून ओळखले जात होते.

हेही वाचा-

हे देखील वाचा