Sunday, September 8, 2024
Home अन्य कार मध्ये गडबड आणि अभिनेत्रीने कंपनीवर दाखल केला ५० कोटींचा खटला…

कार मध्ये गडबड आणि अभिनेत्रीने कंपनीवर दाखल केला ५० कोटींचा खटला…

अभिनेत्री रिमी सेनने तिच्या लग्झरी कारमध्ये दोष आढळून आल्यानंतर कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रिमीने कंपनीवर निष्काळजीपणा आणि तिचा मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे. यासोबतच त्यांनी ५० कोटी रुपयांची भरपाईही मागितली आहे.

गरम मसाला, थँकयू, संकट सिटी, धूम, दे ताली, जॉनी गद्दार, क्यूंकी, गोलमाल आणि हंगामा यासह अनेक चित्रपटांमध्ये अभिनय केलेल्या रिमी सेनचे म्हणणे आहे की ती कंपनीच्या कारची दुरुस्ती करण्याच्या पद्धतीमुळे मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहे आणि त्यामुळेच तिला हे पाऊल उचलावे लागले. रिमीने नुकसानभरपाई म्हणून 50 कोटी रुपयांची मागणी केली आहे. याशिवाय कायदेशीर खर्चासाठी १० लाख रुपयांचीही मागणी करण्यात आली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रिमी सेनच्या लँड रोव्हरमध्ये सनरूफ, साउंड सिस्टम आणि रियर-एंड कॅमेरामध्ये काही दोष होते. तीने ही कार २०२० मध्ये खरेदी केली आणि त्यासाठी ९२ लाख रुपये मोजले. तक्रार दाखल करताना रिमीने दावा केला की २५  ऑगस्ट रोजी. २०२२ रोजी, तीची कार एका खांबाला धडकली कारण मागील बाजूचा कॅमेरा काम करत नव्हता. त्याचवेळी कार डीलर रिमीकडून या गोष्टीचा पुरावा मागत आहे.

अलीकडेच रिमी सेनला प्लास्टिक सर्जरीबाबत सोशल मीडिया यूजर्सनी ट्रोल केले होते. तीचे काही नवीन फोटो समोर आल्यानंतर तीने शस्त्रक्रिया केल्याचा दावा केला जात होता. यावर रिमी सेनने उत्तर दिले की, एखादा माणूस गुन्हा केल्यानंतर पळून जात नसेल तर त्याला प्लास्टिक सर्जरी करण्याची गरज नाही.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा – 

अभिजित सावंतच्या समर्थनार्थ धावून आली पत्नी; त्यांना तुझी गरज आहे तुला नाही…

 

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा