Wednesday, June 26, 2024

अभिनेत्री दिया मिर्झा शोकसागरात, प्रिय व्यक्तीचे अपघातात निधन

बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा (dia mirza) शोकसागरात आहे. तिच्या जवळच्या व्यक्तीचे निधन झाल्याची घटना घडली आहे. तिने आयुष्यातील ही दुःखद घटना चाहत्यांसोबत शेअर केली आहे. काही तासांपूर्वी दियाने तिच्या भाचीचा फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला होता. फोटोसोबत तिने तिचीआठवण करून एक भावनिक कॅप्शन लिहिले आहे. दियाने लिहिले, “माझी भाची. माझी लहान मुलगी माझे प्रेम. तिने हे जग सोडले. माझ्या प्रिय, तू कुठेही असशील, तुला शांती आणि प्रेम मिळो… तू आमच्या हृदयात नेहमी स्मितहास्य आणलेस आणि तू कुठेही असशील, तुझ्या नृत्याने, हसण्याने आणि गाण्याने उजळून निघेल. ओम शांती.”

दियाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर ही बातमी शेअर करताच तिचे चाहते, फॉलोअर्स आणि इंडस्ट्रीतील मित्रांनी कमेंट करून शोक व्यक्त केला. दियाच्या पोस्टवर सुनील शेट्टी, गौरव कपूर, ईशा गुप्ता, सिद्धांत चतुर्वेदी, रिद्धिमा कपूर साहनी आणि इतरांनी कमेंट केली आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Dia Mirza Rekhi (@diamirzaofficial)

बोमन इराणी यांनी हात जोडलेल्या इमोजीसह लिहिले, “हे हृदय तोडणारे आहे. तुमचे शब्द खूप महत्त्वाचे आहेत. आशा आहे की ते ठीक असतील. मी प्रार्थना करतो.” त्याचवेळी अर्जुन रामपालनेही आपले दु:ख व्यक्त केले आणि लिहिले की, “दिया हे ऐकून दुःख झाले. त्यांच्या आत्म्याला आणि तुमच्या परिवाराला शोक आणि प्रार्थना. ओम शांती.”

माध्यमातील वृत्तानुसार, काँग्रेस नेते फिरोज खान यांची सावत्र मुलगी तान्या काकडे सोमवारी (१ ऑगस्ट) सकाळी तिच्या मित्रांसह राजीव गांधी विमानतळावरून हैदराबादला जात असताना तिची कार रस्त्यावरील दुभाजकाला धडकली. या धडकेत चौघेही जखमी झाले आहेत. तान्याचा जागीच मृत्यू झाला.

आरजीआय विमानतळ पोलिसांनी तातडीने तिन्ही प्रवाशांना जवळच्या रुग्णालयात हलवले. तर तान्याचा मृतदेह उस्मानिया रुग्णालयात नेण्यात आला आणि तिच्या पालकांना माहिती देण्यात आली. आम्ही तुम्हाला सांगतो की, तान्या दियाला तिची प्रेरणा मानत असे. दोघांमध्ये खूप चांगले बाँडिंगही होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

आक्षेपार्ह वक्तव्यांवर भडकली आलिया भट्ट, मासिक पाळी आणि अंतर्वस्त्रांबद्दल म्हणाली…

राजीव गांधी हत्येतील दोषीसोबत नाचताना दिसले ‘कटप्पा’ अभिनेता सत्यराज, व्हिडिओ व्हायरल

मल्लिका शेरावतसोबत काम करायला ‘ए-लिस्टर’ स्टार का द्यायचे नकार? अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

हे देखील वाचा