आक्षेपार्ह वक्तव्यांवर भडकली आलिया भट्ट, मासिक पाळी आणि अंतर्वस्त्रांबद्दल म्हणाली…

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या खूप चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्रीने तिच्या प्रेग्नेंसीची बातमी देऊन चाहत्यांना खूश केले होते. याशिवाय, ओटीटी प्लॅटफॉर्मवर ५ ऑगस्ट रोजी रिली होणाऱ्या ‘डार्लिंग्स’सह आलिया भट्टचे अनेक चित्रपटही रिलीझसाठी सज्ज आहेत. आलिया या चित्रपटांचे जोरदार प्रमोशन करत आहे. अलीकडेच, अभिनेत्रीने एक मुलाखत दिली, ज्यामध्ये ती आक्षेपार्ह टिप्पणीवर उघडपणे बोलली आणि सांगितले की,  ती कधीकधी अशा कमेंटकडे लक्ष देत नाही. इंडस्ट्रीतही अशा विधानांना सामोरे जावे लागते, असा खुलासाही आलियाने केला.

आलिया भट्टने तिच्या मुलाखतीत खुलासा केला की, महिलांना समाजात चुकीच्या गोष्टींना कसे सामोरे जावे लागते आणि इंडस्ट्रीतही अनेक प्रसंगी सेक्सिज्म असते. या कमेंट्स ऐकल्यानंतर तिला सेक्सिज्म जाणवले नाही, पण तिला ते नंतर कळले. अभिनेत्री म्हणाली की, जेव्हा महिलांना त्यांच्या ब्रा लपवण्यास सांगितले जाते तेव्हा तिला खूप राग येतो. (alia bhatt on facing objectionable bold comment)
स्वत:बद्दल बोलताना आलिया भट्ट म्हणाली की, “मला अनेकदा आक्षेपार्ह कमेंटचा सामना करावा लागला आहे. तरी मी लक्ष दिले नाही. पण मी या सगळ्यांचा खूप विचार करते, कारण मला या समस्येची जाणीव आहे. जेव्हा मी याबद्दल विचार करतो, तेव्हा मला असे वाटते की ही एक लैंगिक टिप्पणी होती. कधीकधी माझे मित्रही मला सांगतात की मी खूप आक्रमक झाले आहे. मी खूप संवेदनशील आहे.”
आलिया पुढे म्हणाली की, “लोक मला अनेक वेळा सांगतात की, इतके संवेदनशील होऊ नको. तुला मासिक पाळी आली आहे का? मग मी म्हणते, की मी संवेदनशील नाही आणि दुसरेही काही नाही. तुमचा जन्मही यामुळे झाला आहे, कारण स्त्रियांना मासिक पाळी येते.” आलिया शेवटी म्हणाली की, मला खूप राग येतो जेव्हा लोक म्हणतात की, तुझी ब्रा बेडवर नको ठेवू, ब्रा लपवून ठेव? अरे का? माझ्यासोबत असे झाले नाही, पण महिलांना त्यांच्या गोष्टी लपवाव्या लागतात.”

लवकरच आलिया भट्टचा ‘ब्रह्मास्त्र’ रिलीझ होणार आहे.

हेही वाचा

Latest Post