Wednesday, December 3, 2025
Home कॅलेंडर एकेवेळी ‘नॅशनल क्रश’ झालेल्या अभिनेत्रीने शेअर केला बालपणीचा फोटो, पाहा तुम्हाला ओळखतीय का कोण आहे ‘ती’

एकेवेळी ‘नॅशनल क्रश’ झालेल्या अभिनेत्रीने शेअर केला बालपणीचा फोटो, पाहा तुम्हाला ओळखतीय का कोण आहे ‘ती’

सोशल मीडियावर कलाकार नेहमीच त्यांचे वेगवेगळे अनेक फोटोज पोस्ट करत असतात. अनेकवेळा काही कलाकार त्यांचे लहानपणीचे फोटो देखील त्यांच्या फॅन्ससोबत शेयर करत असतात. नुकताच एका अभिनेत्रीने तिचा लहानपणीच अतिशय गोड फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

कॉकटेल चित्रपटातील अभिनेत्री डायना पेंटी हीने तिचा बालपणीचा एक फोटो शेयर केला आहे. हा फोटो इंस्टाग्रामवर शेयर करताना डायनाने विचारले, ” बॉय माझे वय झाले आहे का?” या फोटोमध्ये डायनाने एक लांब फ्रॉक घातला असून तिने डोळ्यांवर मोठा चष्मा घातला आहे. शिवाय तिच्या हातात पेन आणि चमचा आहे.

डायना चित्रपटात येण्यापूर्वी एक यशस्वी सुपरमॉडेल होती. तिने अनेक जाहिरातींमध्ये देखील काम केले आहे. एका जाहिरातीत तिने दीपिका पदुकोणला रिप्लेस केले होते. डायनाने ‘कॉकटेल’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. कॉकटेल नंतर डायना चार वर्षांनी म्हणजे २०१८ मध्ये ‘हैप्पी भाग जायेगी’ सिनेमात दिसली होती.
याशिवाय डायना लखनऊ सेंट्रल, परमाणु : द स्टोरी ऑफ पोखरण, हॅपी फिर भाग जाएगी, खानदानी शफाखाना सारख्या सिनेमांमध्ये दिसली.

डायना २०११ साली आलेल्या इम्तियाज अली याच्या रॉकस्टार सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार होती. मात्र मॉडलिंगच्या कॉन्ट्रॅक्टमुळे तिने या सिनेमासाठी नकार दिला.

डायना लवकरच ‘शिद्दत’ या सिनेमात राधिका मदान आणि सनी कौशल सोबत दिसणार आहे. शिवाय ती सिद्धार्थ मल्होत्रा सोबत एका रोमँटिक व्हिडिओ ‘छल्लों के निशान’ मध्ये देखील दिसणार आहे.

हे देखील वाचा