बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) हे बीटाउनच्या लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. गेल्या वर्षी 9 डिसेंबरला कॅटरिना आणि विकी कौशलचे लग्न झाले होते. आता हे दोघेही त्यांच्या कामासोबतच एक सुंदर कौटुंबिक जीवन जगत आहेत. आज आम्ही तुम्हाला कॅटरिनाच्या लव्ह लाईफबद्दल सांगणार आहोत. रिपोर्ट्सनुसार, कॅटरिना कैफच्या आयुष्यात सलमान खान (Salman Khan) आणि रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) नावाचा समावेश आहे.
कॅटरिना कैफचे नाव इंडस्ट्रीतील टॉप आणि सुंदर अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट आहे. जरी कॅटरिना आज विकी कौशलसोबत तिचे सुखी कौटुंबिक जीवन जगत असली, तरी एक काळ असा होता जेव्हा तिचे नाव सलमान खानसोबत जोडले जात होते. सलमान खान आणि कॅटरिना कैफने अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. ज्यामध्ये ‘एक था टायगर’, ‘टायगर जिंदा है’, ‘भारत’, ‘मैने प्यार क्यूं किया’ यांसारख्या चित्रपटांची नावे आहेत. (did katrina kaif break up with salman khan for this actor)
सलमान खानशी जवळीक
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘मैने प्यार क्यूं किया’मध्ये जेव्हा सलमान आणि कॅटरिना एकत्र काम करत होते, तेव्हा त्यांच्यामध्ये प्रेमाची प्रक्रिया सुरू झाली होती. सलमान आणि कॅटरिनाच्या नात्याबद्दल मीडियामध्ये खूप चर्चा झाली. मात्र दोन्ही स्टार्सनी आजपर्यंत कधीच त्यांच्या नात्याची अधिकृत कबुली दिली नाही. पण दरम्यान कॅटरिना कैफच्या आयुष्यात रणबीर कपूरची एन्ट्री झाली.
रणबीर कपूरला केले डेट
बातम्यांनुसार, कॅटरिना आणि रणबीर ‘अजब प्रेम की गजब कहानी’ या चित्रपटात एकत्र दिसले होते. इथून दोघांमध्ये जवळीक वाढू लागली. कॅटरिनाने सलमान खानसोबत ब्रेकअप केले आणि रणबीरसोबत नाते जोडले. मात्र, रणबीर आणि कॅटरिनाचे हे नातेही फार काळ टिकले नाही. कॅटरिनाला सोडून रणबीर लवकरच आलिया भट्टच्या (Alia Bhatt) जवळ आला.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
तूच खरा देवदूत! सलमान खानने वाचवला होता अभिनेत्री दिया मिर्झाच्या आईचा जीव, एकाच फोनवर पोहोचला होता घरी
सलमान खानवर एक्स गर्लफ्रेंडने केले गंभीर आराेप; म्हणाली, ‘सिगारेटचे चटके देऊन…’