Friday, July 5, 2024

नऊ वर्षाच्या नोबोजितची कमाल! ‘डियाडी लिटल मास्टर ५’ च्या विजेतेपदावर कोरले नाव, मिळाली ‘इतकी’ रक्कम

झी टिव्हिवरील सर्वात लोकप्रिय डान्स शो म्हणून ‘डान्स इंडिया डान्स’ या कार्यक्रमाची चर्चा होताना दिसत आहे. सध्या या कार्यक्रमाचा अंतिम विजेता कोण होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. अशातच या विजेतेपदासाठी निवडलेले नावही नुकतेच समोर आले आहे. आसाममधील नोबोजित नरझारीची झी टीव्हीच्या लोकप्रिय शो डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर्सच्या सीझन 5 चा विजेता म्हणून निवड झाली आहे. नोबोजित अवघ्या 9 वर्षांचा आहे आणि इतक्या लहान वयात त्याने आपल्या जबरदस्त डान्स मूव्ह्सने प्रेक्षकांची तसेच जजची मने जिंकली आहेत. नोबोजितने फ्रीस्टाइल, हिप हॉप तसेच विविध नृत्यशैलींमध्ये आपल्या उत्कृष्ट कामगिरीने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. नोबोजित अवघ्या नऊ वर्षांचा असून त्यासाठी त्याने गेल्या दोन वर्षांपासून कसून सराव केला आहे.

डीआयडी लिटिल मास्टर्ससाठी प्रत्येक वेळी प्रमाणेच या वेळीही अनेक मुलांनी ऑडिशन दिल्या होत्या ज्यामधून टॉप 15 निवडले गेले. तीन महिने खडतर नृत्य स्पर्धा दिल्यानंतर, सागर, नोबोजित, अप्पन, आध्याश्री आणि इशिता 26 जून 2022 च्या ग्रँड प्रीमियर एपिसोडमध्ये टॉप 5 स्पर्धकांपर्यंत पोहोचले आणि फिनालेमध्ये परफॉर्म केले होते. त्यानंतर नोबोजितची विजेता म्हणून निवड करण्यात आली. अप्पन आणि आध्याश्री यांना अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय उपविजेते घोषित करण्यात आले.

जुग जुग जिओ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगला कलेक्शन करत आहे. चित्रपटातील कलाकार  अजूनही जोरदारपणे त्याचे प्रमोशन करत आहेत आणि याच प्रमोशनसाठी अनिल कपूर, कियारा अडवाणी, वरुण धवन, प्राजक्ता कोळी आणि मनीष पॉल शोमध्ये आले आणि त्यांनी खूप मजा केली तसेच स्पर्धकांचा उत्साह वाढवला. नोबोजितला डीआयडी लिटिल मास्टर्स ट्रॉफी देण्यात आली  तसेच आणखी एका स्पर्धकाने सर्वांचे मन जिंकले आणि तो म्हणजे अहमद राजा. शोच्या सर्व अंतिम स्पर्धकांना डीआयडी लिटल मास्टर्सकडून रोख बक्षिसे आणि विशेष सरप्राईज देण्यात आले.

डीआयडी लिटिल मास्टर्स सीझन 5 चे विजेता नोबोजितने “डीआयडी लिटिल मास्टर्सने मला जे स्वप्न पाहिले ते सर्व दिले! या रिअलिटी शोने अनेक प्रतिभावान स्पर्धकांना त्यांची प्रतिभा दाखवण्याची संधी दिली आणि मला आनंद आहे की मी माझे नृत्य कौशल्य दाखवू शकलो आणि विजय मिळवला. इथपर्यंत पोहोचण्यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे आणि दर आठवड्याला मनापासून मनापासून नृत्य केले आहे. माझा कर्णधार वैभव आणि न्यायाधीश – रेमो सर, मौनी रॉय आणि सोनाली मॅडम यांनी मला शिकण्यास आणि वाढण्यास खूप मदत केली आणि त्यांच्या समर्थन आणि प्रोत्साहनाबद्दल मी खूप आभारी आहे,” अशा शब्दात आपला आनंद व्यक्त केला.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा