Tuesday, September 17, 2024
Home बॉलीवूड …म्हणून Rakul Preet ने मेहेंदी सेरेमनीच्या लेहेंग्यासाठी डिझायनरचे मानले आभार

…म्हणून Rakul Preet ने मेहेंदी सेरेमनीच्या लेहेंग्यासाठी डिझायनरचे मानले आभार

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये नुसती चर्चा सुरु आहे ती म्हणजे, अभिनेत्री रकुल प्रीत आणि अभिनेता जॅकी भगनानी(Rakul Preet Singh and Jackky Bhagnani )  यांच्या लग्नाची. हे दोघे २१ फेब्रुवारीला विवाहबंधनात अडकले. त्यानंतर दोघांच्या लग्नसोहळ्याचे अनेक अनसीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. अशातच विशेष चर्चा सुरु आहे ती म्हणजे रकुलच्या मेहंदी सेरेमनीच्या (Mehendi Ceremony) लेहेंग्याची.

दोन दिवसांपूर्वी रकुलने(Rakul Preet Singh) आपल्या इंस्टाग्रामवर मेहेंदी सेरेमनीचे फोटो शेअर केले होते. यावेळी तिनं नारंगी रंगाचा लेंहेंगा परिधान केला होता. या आऊटफिटमध्ये रकुल खुपच सुंदर दिसत होती. तिच्या या लुकवर चाहतेसुद्धा फिदा झाले होते. अनेक चाहत्यांनी तु लग्नापेक्षा या लुकमध्ये खुप सुंदर दिसतेस अशा कमेंट्स केल्या होत्या.

रकुलने (Rakul Preet Singh) हे फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये डिझायनरचे आभार मानलं होते. फुलकरीला पुनरुज्जीवित करणारा सर्वात सुंदर पोशाख डिझाइन केल्याबद्दल @arpita__mehta चे आभार. असं रकुलने कॅप्शनमध्ये म्हटले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakul Singh (@rakulpreet)

तिच्या या पोस्टनंतर चर्चा सुरु झाली ती म्हणजे लेहेंग्याची. इतका सुंदर लेहेंगा बनवायला किती तास लागले. कोणी डिझाईन केला आहे? असं अनेक प्रश्न तिच्या चाहत्यांना पडले आहेत. तर याचा खुलासा स्वतः डिझायनरने केला आहे.डिझायनर अर्पिता मेहता (Arpita Mehta) हिने रकुलचा(Rakul Preet Singh) हा लेहेंगा डिझाइन केला आहे.

अर्पिता मेहताने सोशल मीडियावर या आउटफिटचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये अर्पिताची संपूर्ण टीम कशी तयार करत आहे आणि किती बारीक काम करत आहे हे दाखवण्यात आले आहे. अनेक महिन्यांच्या मेहनतीनंतर आणि एकामागून एक अनेक चाचण्या घेतल्यानंतर हा लेहेंगा तयार करण्यात आला. अशी माहिती डिझायनर अर्पिता मेहताने यावेळी दिली. मेहताने कॅप्शनमध्ये हा लेहेंगा तयार करण्यासाठी किती तास लागले याचा उल्लेख केला आहे.

रकुलचा हा डिझायनर फुलकारी लेहेंगा बनवायला ६८० तास लागले. डिझायनर अर्पिता मेहता आणि तिच्या टीमने रकुलसाठी खास पद्धतीने हा आऊटफिट तयार केला आहे. यात गुलाबी आणि केशरी सिंदूर धाग्यांनी फुलकरी भरतकाम केलेले, सोनेरी कसब आणि काटदाना आहे. याशिवाय या लेहेंग्यात मिरर वर्कही करण्यात आले आहे.

रकुल आणि जॅकी यांनी त्यांचं लग्न अतिशय प्रायव्हेट ठेवलं. त्यांनी आनंद कारज पद्धतीने विवाह केला आहे. आनंद कारज या पद्धतीला शीख धर्मात खूप महत्व आहे. याचा अर्थ आनंदासाठी कार्य करणे किंवा आनंदी जीवनासाठी कार्य करणे. याची सुरुवात शीख गुरु अमर दास यांनी केली होती. या लग्नात फक्त चार फेऱ्या होतात, तर हिंदू धर्मात सात फेरे घेतले जातात.

हेही वाचा:

लग्नाच्या सहा दिवसांनंतर रकुल-जॅकीचे मेहेंदी सेरेमनीचे फोटो व्हायरल

12 फेल फेम विक्रांत मेस्सी दिसणार नव्या भूमिकेत; ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपटाचा टिझर लाँच

author avatar
tdadmin

हे देखील वाचा