Monday, April 15, 2024

Vikrant Massey दिसणार नव्या भूमिकेत; ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपटाचा टिझर लाँच

12 फेल फेम (12th Fail) अभिनेता विक्रांत मेस्सी (Vikrant Massey) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 12 वी फेल या चित्रपटाच्या यशानंतर विक्रांत नव्या चित्रपटासाठी सज्ज झाला आहे. विक्रांतच्या आगामी चित्रपटांची चाहते उत्सुकतेने वाट बघत आहेत. अशताच विक्रांतने ‘द साबरमती रिपोर्ट’ (The Sabarmati Report) या आगामी चित्रपटाचा टीझर लाँच करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.

नुकतचं इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत विक्रांत मेस्सीने ((Vikrant Massey)) लिहिले की, २२ वर्षांपूर्वी गोध्रा ट्रेन आगीत प्राण गमावलेल्या ५९ निष्पाप लोकांना श्रद्धांजली वाहतो. साबरमती अहवाल ३ मे २०२४ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या पोस्टनंतर चाहत्यांनी नवीन प्रोजेक्टसाठी त्याचे अभिनंदन केले आहे.

या आगामी चित्रपटात विक्रांत एका पत्रकाराच्या भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटाच्या टीझरच्या सुरुवातीला विक्रांत हा २७ फेब्रुवारी २००२ मध्ये घडलेल्या घटनेची बातमी सांगताना दिसत आहे. ही बातमी वाचताना विक्रांत म्हणतो, ‘सर, साबरमती एक्स्प्रेस का जलना दुर्घटना नहीं थी’ विक्रांतच्या या डायलॉगनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. पुढे टिझरमध्ये गोध्रा आणि साबरमती एक्सप्रेसचे रिअल फुटेज दिसतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vikrant Massey (@vikrantmassey)

या चित्रपटात विक्रांत मेस्सी सोबत राशी खन्ना, रिद्धी डोग्रा या अभिनेत्रीही प्रमुख भूमिकेत आहेत. हे. रंजन चंदेल यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. शोभा कपूर, एकता आर कपूर, अमूल व्ही मोहन आणि अंशुल मोहन हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.

विक्रांतच्या ’12वी फेल’ या चित्रपटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात विक्रांतनं आयपीएस मनोज कुमार शर्मा यांची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील विक्रांतच्या कामाचे खूप कौतुक झाले. आता विक्रांतच्या ‘द साबरमती रिपोर्ट’ या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

हेही वाचा:

Ananya Panday लवकरच होणार मावशी; बहिण अलानाने बेबी बंप फ्लान्ट करत दिली गुड न्यूज

घटस्फोटाच्या चर्चेत अंकिता लोखंडेचा लग्नासंदर्भात धक्कादायक खुलासा

हे देखील वाचा