Saturday, April 19, 2025
Home मराठी ‘दिल दिमाग और बत्ती’ चित्रपट करतोय प्रेक्षकांच्या मनावर राज्य, अल्पावधीत मिळाला उदंड प्रतिसाद

‘दिल दिमाग और बत्ती’ चित्रपट करतोय प्रेक्षकांच्या मनावर राज्य, अल्पावधीत मिळाला उदंड प्रतिसाद

अलीकडे अनेक मराठी चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाले आहेत. त्यामुळे प्रेक्षकांचे देखील उन्हाळ्यात चांगलेच मनोरंजन होत आहे. या सगळ्यात ७० ते ८० च्या दशकाची आठवण करून देणारा ‘दिल दिमाग और बत्ती‘ (dil dimag aur batti) हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडत आहे. त्यामुळे चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. मनोरंजनाचा खजिना घेऊन आलेला हा चित्रपट प्रेक्षकांची मने जिंकत आहेत.

‘दिल दिमाग और बत्ती’ या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि लेखक हृषीकेश गुप्ते (hrishikesh gupte) यांनी मराठीत पहिल्यांदाच एक आगळा वेगळा प्रयत्न केला आहे. जो यशस्वी होताना दिसत आहे. चित्रपटाची खासियत म्हणजे या चित्रपटात एकूण २० दिग्गज कलाकार आहेत. त्यामुळे कॉमेडीचा तडका या चित्रपटात पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी या चित्रपटाचे शो हाऊसफुल होताना दिसत आहेत. चित्रपटातील गाणी देखील प्रेक्षकांची माने जिंकत आहेत. ‘अब्बासवानी’ आणि ‘घोडा लावीन तुला’ या दोन गाण्यांनी सध्या वेड लावले आहे.

प्रेक्षकांचा देखील या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. हा चित्रपट शुक्रवारी ६ मे रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर आणि पोस्टर पाहूनच सगळ्यांना या चित्रपटाची उत्सुकता लागली होती. चित्रपटात असणाऱ्या कलाकारांना देखील खूप प्रेम मिळताना दिसत आहे.

चित्रपटात दिलीप प्रभाळकर, सागर संत, संस्कृती बालगुडे, वंदना गुप्ते, पुष्कर श्रोत्री, किशोर कदम, आनंद इंगळे, वैभव मांगले, सागर संत, मयुरेश पेम, सखी गोखले, पुष्कराज चिरपुटकर, रेवती लिमये, मेघना एरंडे, संजय कुलकर्णी, विनीत भोंडे असे कलाकार दिसत आहे. त्यामुळे त्यांचा चित्रपट देखील तसाच भन्नाट असेल यात काही वाद नाही. तसेच अवधूत गुप्ते यांनी या चित्रपटातील गाण्यांना आवाज दिला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा