×

दमदार कलाकार अन् सुपरहीट गाण्यांमुळे चर्चेत येतोय ‘दिल दिमाग और बत्ती’ चित्रपट

सध्या बॉक्स ऑफिसवर अनेक मराठी चित्रपट धुमाकूळ घालताना दिसत आहेत. तसेच अनेक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. याच यादीतील एक चित्रपट म्हणजे ‘दिल दिमाग और बत्ती’. या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा चालू आहे. चित्रपटात तगडी स्टार कास्ट असल्याने चित्रपट सर्वत्र चर्चेत आहे. ८०- ९० च्या दशकातील चित्रपटांची आठवण करून देणारा आणि त्यांना ट्रिब्यूट देणारा हा चित्रपट असणार आहे. चित्रपटाचा पोस्टर, ट्रेलर आणि काही गाणी प्रदर्शित झाली आहेत. चित्रपटात एकूण २० कलाकार आहेत. त्यामुळे हा चित्रपट चांगलाच गाजणार असल्याचे दिसत आहे. 

सध्या मराठी सिनेमागृहात एकापेक्षा एक नाविण्यपूर्ण चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यामुळे सध्या सगळीकडेच मराठी चित्रपटांची चर्चा पाहायला मिळत आहे. या चित्रपटांमध्ये सध्या ‘दिल दिमाग और बत्ती’ या चित्रपटाची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन ऋषिकेश गुप्तेने केले आहे. या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, सागर संत जेष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, संस्कृती बालगुडे, आनंद इंगळे, वैभव मांगले, किशोर कदम, पुष्कर श्रोत्री अशी तगडी कलाकार मंडळी पाहायला मिळणार आहे.

सध्या या चित्रपटातील तीन गाणी प्रदर्शित झाली आहेत. ‘ही कहाणी ना’, ‘इश्क केला रे’, ‘घोडा लावीन तुला’ अशी मजेशीर गाणी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या गाण्यांना प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच गायक अवधूत गुप्तेने नाव वेगळे असले तरी या गाण्यांचा अर्थ जोरदार आहे, असे म्हणत सेन्सार बोर्डाचे कौतुक केले होते. त्यामुळे प्रत्येकालाच या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. चित्रपट २२ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तब्बल २० दमदार कलाकारांचा अभिनय, सुपरहीट होत असलेली गाणी त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच कमाल करणार असल्याचे दिसत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

Latest Post