मुलीच्या प्री-वेडिंग सेरेमनीमध्ये दिलीप जोशींनी धरला जबरदस्त ठेका, डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल


तारक मेहता का उलटा चष्मा‘ या लोकप्रिय मालिकेत जेठालाल हे पात्र निभावून घराघरात पोहचलेले अभिनेते म्हणजे दिलीप जोशी होय. ते सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहेत. त्यांची मुलगी नियती जोशी उद्या म्हणजेच शनिवारी (११ डिसेंबर) रोजी विवाहबंधनात अडकणार आहे. तिच्या लग्नाच्या आधीचे सगळे कार्यक्रम चालू झाले आहेत. याची झलक सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. या व्हिडिओमध्ये जेठालाल जबरदस्त डान्स करताना दिसत आहे.

जेठालालच्या एका फॅन क्लबने हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, दिलीप जोशी यांनी हिरव्या रंगाचा कुर्ता घातला आहे. या व्हिडिओमध्ये ते ढोलच्या आवाजावर डान्स करत कार्यक्रमात गाताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये सुरुवातीला ते ढोल वाजवणाऱ्या व्यक्तीसमोर उभे राहतात आणि जोरदार डान्स करत आहेत. तसेच बॅकग्राऊंडला डीजेचे गाणे देखील लागले आहे. लग्नात आलेले पाहुणे देखील त्यांना पाहून जोरदार डान्स करत आहेत. (dilip joshi daughter niyati pre wedding events, jethalal dance video viral)

ते त्यांच्या डान्समध्ये गरबा खेळत आहे. तसेच काही महिला देखील त्यांच्या मागे दांडिया खेळताना दिसत आहे. शेवटी ते या कार्यक्रमात आलेल्या एका गायकाचा माईक घेऊन उभे राहिलेले आहेत. ते त्यांच्या सूरात सूर मिसळवताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये त्यांच्या चेहऱ्यावर मुलीच्या लग्नाचा आनंद साफ दिसत आहे.

दिलीप जोशी यांच्या मुलीचे लग्न शनिवारी (११ डिसेंबर) रोजी मुंबईमधील ताज हॉटेल येथे होणार आहे. त्यांनी मुलीच्या लग्नात दिशा वकानी, असित मोदी आणि शैलेश लोढासोबत ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ मालिकेतील सगळ्या कलाकारांना आमंत्रित केले आहे.

‘तारका मेहता का उलटा चष्मा’ ही टेलिव्हिजनवरील एक लोकप्रिय मालिका आहे. मालिकेने मागील अनेक वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. मालिकेतील प्रत्येक पात्राचे एक वेगळे आणि खास फॅन फॉलोविंग आहे. मुळात या मालिकेचे यश म्हणजे या मालिकेतील कलाकार आहेत. प्रत्येक कलाकार खूप चांगल्या पद्धतीने त्यांचे पात्र निभावत आहेत.

हेही वाचा :

 


Latest Post

error: Content is protected !!