Wednesday, July 3, 2024

…म्हणून दिलीप कुमार अन् लता दीदींमध्ये झाले मतभेद, तब्बल ‘इतकी’ वर्षे होता नात्यात अबोला

चित्रपटसृष्टीत काम करत असताना सहकलाकारांसोबत वेळ घालवावा लागतो. एकमेकांसोबत घालवलेला वेळ आणि एकमेकांतील गुणांची ओळख झाली की, दोन कलाकारांमध्ये मैत्री व्हायला वेळ लागत नाही. कधी कधी काही कलाकार एकमेकांच्या प्रेमात पडतात. तर कधी कधी सहकलाकाराच्या रूपात एखाद्या भाऊ, बहीण किंवा अशी अनेक जवळची नाती मिळतात. बॉलिवूडमध्ये ‘ट्रॅजेडी किंग’ दिलीप कुमार (Dilip Kumar) अभिनयासोबतच आपल्या मनामेळावू स्वभाव आणि चांगुलपणासाठी ओळखले जातात. त्यांचे गानकोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्याशी एक खूप खास नाते होते. ते लता दीदींना लहाण बहीण मानायचे. लता दीदी दिलीप कुमार यांना रक्षाबंधनाला राखी देखील बांधायच्या. पण या दोघा भावाबहिणीच्या नात्याला कोणाची तरी दृष्ट लागली आणि या दोघांनी एकमेकांशी बोलणे पूर्णपणे बंद केले.

‘इतके’ वर्षे एकमेकांशी बोलणं होत बंद
गानकोकिळा लता मंगेशकर आणि अभिनेते दिलीप कुमार यांच्यात मतभेद झाले होते. त्यामुळे या दोघांनी जवळजवळ १३ वर्षे एकमेकांशी बोलणं बंद केले होते. माध्यमांतील वृत्तानुसार, सलील चौधरी यांनी ‘मुसाफिर’ या चित्रपटातील ‘लागी नाहीं छूटे’ हे गाणे गाण्यासाठी दिलीप कुमार यांची निवड केली. तेव्हाच या दोघांमध्ये मतभेद सुरू झाले. मात्र, लता मंगेशकर यांना माहित नव्हते की, दिलीप कुमार त्यांच्यासोबत गाणं गाणार आहेत. (dilip kumar and lata mangeshkar did not talk for 13 years because of this reason)

दिलीप कुमार यांच्याबद्दल लता मंगेशकर झाल्या कनफ्यूज
खरं तर, जेव्हा लता मंगेशकर यांना कळाले की, दिलीप कुमार देखील त्यांच्यासोबत चित्रपटात गाणे गाणार आहेत. तेव्हा त्यांना प्रश्न पडला की दिलीप कुमार गाणे गाऊ शकतील का? ‘लागी छूटे ना’ या गाण्याला सलील चौधरी यांनी संगीत दिले होते. इतकेच नव्हे, तर दिलीप कुमार यांनी देखील गाणं म्हणण्यासाठी कोणतीच कसर सोडली नाही. त्यांनी सितारमध्ये सूर मिसळून या गाण्याचा रियाजही केला.

लता मंगेशकरांसोबत गाणं गाण्यास वाटली भीती
दिलीप कुमार यांनी हे गाणं गाण्यासाठी कोणतीच कसर जरी सोडली नसली, तरीही त्यांना एक अडचण आली. जेव्हा हे गाणे रेकॉर्ड करण्याची वेळ आली, तेव्हा ते थोडे घाबरू लागले. खरं तर, दिलीप कुमार यांना गाण्याची नाही, तर लता मंगेशकर यांच्यासोबत गाण्याची जास्त भीती वाटत होती. याचे मुख्य कारण म्हणजे त्या खूप चांगल्या गायिका आहे. दिलीप कुमार यांची ही भीती घालवण्यासाठी सलील चौधरी यांनी त्यांना ब्रँडी पिण्यास दिली.

दिलीप कुमार आणि लता मंगेशकर यांच्यात मतभेद
ब्रँडी पिल्यानंतर दिलीप कुमार यांनी लता मंगेशकरांसोबत एक गाणे गायले. मात्र हे गाणं रेकॉर्ड करत असताना, त्यांचा आवाज लता मंगेशकर यांच्या आवाजासमोर खूपच कमकुवत होता. लता यांनी ही रेकॉर्डिंग खूप मनापासून पूर्ण केली. या रेकॉर्डिंगनंतर दिलीप कुमार आणि लता मंगेशकर यांच्यात मतभेद सुरू झाले. जे बऱ्याच काळापर्यंत टिकून राहिले. १९७० मध्ये जेव्हा त्यांच्यातील अबोला संपला, तेव्हा लता मंगेशकर यांनी पुन्हा एकदा दिलीप कुमार यांना राखी बांधली.

‘यामुळे’ झाले होते मतभेद
दिलीप कुमार आणि लता मंगेशकर यांच्यात मतभेद होण्यामागचे कारणही तसेच होते. जेव्हा दिलीप कुमार यांनी लता मंगेशकर यांना बघून ‘मराठ्यांची उर्दू अगदी वरण भातासारखी असते’ अशी प्रतिक्रिया दिली होती. ही गोष्ट लता मंगेशकरांना इतकी मनाला लागली की, त्यांनी दिलीप कुमार यांच्याशी बोलणं तर बंद केलंच, त्याचबरोबर त्यांनी उर्दू शिकण्याचाही निर्णय घेतला.

हे देखील वाचा