दिलीप कुमार शाहरुख खानला मानायचे त्यांचा मुलगा; पत्नी सायरा बानो म्हणाल्या होत्या, ‘आमचा मुलगा असता तर…’


बॉलिवूडचे ‘ट्रॅजेडी किंग’ म्हणून ओळखले जाणारे अभिनेते दिलीप कुमार यांचे बुधवारी (७ जुलै) रोजी निधन झाले आहे. त्यांनी सकाळी ७:३० वाजता या जगाचा निरोप घेतला. या गोष्टीची माहिती त्यांच्या डॉक्टरांनी सकाळी दिली आहे. ‘ज्वार भाटा’ या चित्रपटातून करिअरला सुरुवात केलेल्या दिलीप कुमार यांनी पाच दशकं एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट केले आहेत. दिलीप कुमार आणि त्यांची पत्नी सायरा यांना मुल नाहीये. पण त्यांनी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याला त्यांचा मुलगा मानला आहे. (Dilip kumar and saira bano consider shahrukh Khan as their son)

दिलीप कुमार आणि सायरा बानो यांचे शाहरुख खानसोबत एक वेगळेच नाते आहे. अनेकवेळा असे फोटो समोर आले आहेत, ज्यात शाहरुख खान हा दिलीप कुमार आणि सायरा बानो यांच्यासोबत दिसला आहे. त्यांच्या निधनानंतर शाहरुख खान त्यांच्या घरी गेला होता. त्याला त्यांच्या घरात मुलाचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे तो तिथे कुटुंबाप्रमाणे वावरत होता.

शाहरुख खानचे वडील मोहम्मद खान यांचा जन्म आणि पालन-पोषण त्याच गल्लीमध्ये झाले होते, ज्या गल्लीमध्ये दिलीप कुमार यांचे घर होते. माध्यमातील वृत्तानुसार, शाहरुख खानने देखील त्या गल्लीमध्ये अनेक दिवस-रात्र काढले आहेत.

दिलीप कुमार आणि सायरा बानो यांना मुल नाही, याबाबत जवळपास ४ वर्षांपूर्वी सायरा बानो यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, जर त्यांना मुल असतं तर ते अगदी शाहरुख खानप्रमाणे असतं. त्यांनी सांगितले होते की, शाहरुख खान आणि दिलीप कुमार यांचे केस सारखे आहेत. याच कारणामुळे त्या जेव्हा शाहरुख खानला भेटायच्या, तेव्हा त्याच्या केसावरून हात फिरवायच्या.

त्यांनी पुढे सांगितले की, “शाहरुख खान एकदा त्यांना भेटायला आला होता तेव्हा तो स्वतःहून म्हणाला होता की, तुम्ही आज माझ्या केसावरून हात नाही का फिरविणार? हे ऐकून मला खूप आनंद झाला होता.”

शाहरुख खानने २०१३ मध्ये सांगितले होते की, दिलीप कुमार आणि सायरा बानो त्याला मुलाप्रमाणे प्रेम करतात आणि त्यांचे नाते खूप चांगले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.