‘तुझ्यात जिव रंगला‘ या मालिकेतून ‘वहिनीसाहेब’ या भूमिकेनी प्रेक्षकांवर राज्य करणारी अभिनेत्री धनश्री काडगावकर होय. तिने मालिकाच नाही, तर मराठी चित्रपटातही मुख्य भूमिका निभावल्या आहेत. मात्र, तुझ्यात जिव रंगला या मालिकेतील तिच्या खलनायकी भूमिकेमुळे तिला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. या मालिकेने संपूर्ण महाराष्ट्राला भुरळ घातली होती. धनश्री या मालिकेनंतर ‘तु चाल पुढ‘ यामध्ये झळकत आहे. यामध्ये देखिल तिच्या खलनायकी भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.
धनश्री (Dhanashri Kadgaonkar) सोशल मीडियावर सक्रिय असते. ती तिचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिच्या पोस्टवर चाहते भन्नाट कमेंट करत असतात. तिच्या पोस्ट सतत चर्चेचा विषय ठरत असतात. अभिनेत्री धशश्री काही महिन्यांपूर्वी आई झाली आहे. त्यानंतर ती लगेच मालिकेच्या सेटवर परतली. यादरम्यान तिने एक सोशल मीडिया पोस्ट शेअर केली आहे. जी सध्या खूप चर्चेत आहे. धनश्रीने तिच्या मुलासाठी ही पोस्ट केली आहे.
पोस्ट करताना कॅप्शनमध्ये धनश्रीने लिहीले की, “मी सेटवर परतली तेव्हा कबीर फक्त दीड वर्षांचा होत. तेव्हा मी पुणे सोडून कामासाठी मुंबईत आले. पण त्यावेळी लगेच कबीरला मुंबईत आणणं माझ्यासाठी शक्य नव्हत. कारण त्याचा दवाखाना आणि बाकी सर्व गोष्टी पुण्यात चालू होत्या. तेव्हा मला असं वाटलं की मी खूप मोठी चूक केली आहे. माझ्याकडून खूप घाई झाली आहे. मी थोडं थांबायला हवं होतं. कदाचित कबीर मला विसरुन जाईल का? असही मला वाटलं होतं. पण ठरावीक वेळ निघून गेल्यानंतर सर्व काही नीट होत.”
View this post on Instagram
तिने पुढे लिहीले की, “कबीरला अजून सिरीयल म्हणजे काय? हे माहित देखील नाही. कारण त्याची आणि टिव्हीची अजुन ओळखही झालेली नाही. कबीरला फक्त एवढंच माहिती आहे की, त्याची आई शूटिंग करते, मेकअप करते. पण आजतागायत त्याने मी घरात नाही म्हणून गोंधळ घातलेला नाही. ”
त्याचवेळी धनश्रीने एक अपेक्षा व्यक्त केली आहे. ती म्हणाली की, “आई तू खूप चांगलं काम करतेस आणि असंच करत रहा… तू मला फार वेळ देऊ शकत नाहीस पण तू माझ्या भविष्याची तरतूद करतेयस..” हे शब्द मला त्याच्याकडून ऐकायचे आहेत. तसेच तिने प्रेक्षकांचे आभार देखील मानले आहेत. धनश्रीने कबीरचा एक छान व्हिडिओ शेअर केला आहे. सध्या हा व्हिडिओ पाहून चाहते त्यावर लाईक आणि कमेंटचा पाऊसच पाडत आहेत. (Actress Dhanshree Kadgaonkar’s post for her little boy)
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अक्षय कुमारच्या प्रेमात बुडाली होती शिल्पा शेट्टी; धोका मिळाल्यानंतर थाटला आधीच विवाहित असलेल्या राज कुंद्राशी संसार
‘अशी’ झाली होती शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राची पहिली भेट; वाचा त्यांच्या प्रेमाची आगळी वेगळी कहाणी