Tuesday, June 10, 2025
Home बॉलीवूड ‘मी त्याला अनेकदा मरताना पाहिलंय…’, सुशांतच्या आठवणीत दिग्दर्शक भावुक, व्हिडिओ केला शेअर

‘मी त्याला अनेकदा मरताना पाहिलंय…’, सुशांतच्या आठवणीत दिग्दर्शक भावुक, व्हिडिओ केला शेअर

बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतने १४ जून, २०२० रोजी मुंबईतील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याच्या निधनाने अवघे जग हळहळले होते. त्याच्या चाहत्यांसोबतच अनेक सेलिब्रिटींनी त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजलीही वाहिली होती. त्याच्या मृत्यूला अनेक महिने उलटले असले, तरीही त्याची चर्चा होत आहे. त्याचे सहकलाकार त्याची आठवण काढत आहेत. असाच बॉलिवूडमधील एक दिग्दर्शक सुशांतची आठवण काढून भावुक झाला आहे. त्या दिग्दर्शकाने एक व्हिडिओ शेअर केला आहे.

तो दिग्दर्शक इतर कोणी नसून ‘अभिषेक कपूर’ आहे. सुशांतची आठवण काढत अभिषेकने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर ‘काय पो छे’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तो सुशांतला सांगत आहे की, आपले हावभाव कसे असले पाहिजे. या व्हिडिओत सुशांत आणि राजकुमार रावमध्ये एक फाईट सीन होताना दिसत आहे. व्हिडिओत सुशांत खूप मेहनत घेताना दिसत आहे.

अभिषेकने हा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, ‘आम्ही या चित्रपटाची कहाणी लिहिताना खूप रोमांचित होतो. मला आठवते की जेव्हा आम्ही याचा क्लायमॅक्स लिहिला होता, तेव्हा मी रडलो होतो. मी तेव्हाही रडलो होतो, जेव्हा आम्ही या सीनचे शूटिंग पूर्ण केले होते. त्यानंतर मी याचे एडिटिंग पाहिले होते, तेव्हाही रडलो होतो.’

‘मी सर्वात जास्त तेव्हा रडलो होतो, जेव्हा मी हे बॅकग्राऊ स्कोरसोबत पाहिले होते. मी सुशांतला अनेकदा मरताना पाहिले होते, केदारनाथमध्येही. मला वाटते की, याच कारणामुळे १४ जूनला जेव्हा आपल्याला ही खूपच वाईट बातमी मिळाली, तेव्हा मी सुन्न झालो होतो, जसा मी आतापर्यंत आहे,’ असेही त्याने पुढे लिहिले.

यापूर्वीही अभिषेकने सुशांतची आठवण काढली आहे आणि त्याच्याशी संबंधित पोस्टही शेअर केले आहेत. ‘केदारनाथ’ चित्रपटाला २ वर्षे झाल्यानंतर त्याने सुशांतबद्दलची भावुक पोस्ट शेअर केली होती.

अभिषेकने ‘फितूर’, ‘रॉक ऑन’ यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शनही केले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘फ्लाय’ गाण्यातून पहिल्यांदाच आली बादशाह-शेहनाजची केमेस्ट्री चाहत्यांसमोर, पाहा युट्यूबर ट्रेंडिंगमध्ये असलेलं हे गाणं

-विवेक ओबेरॉयच्या प्लेटमध्ये ऑम्लेटच्या जागी चक्क हेल्मेट! मजेशीर व्हिडिओ सोशलवर व्हायरल

हे देखील वाचा