Friday, December 13, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘शेर शिवराज’ चित्रपटात स्वःत दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर साकारणार ‘ही’ महत्वाची भूमिका

सध्या मराठी चित्रपटसृष्टीत एकापेक्षा एक ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या चित्रपटातून महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास उलघडला जात आहे. त्यामुळे या ऐतिहासिक चित्रपटांना प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद पाहायला मिळत आहे. नुकताच प्रदर्शित झालेला ‘पावनखिंड‘ चित्रपटही प्रचंड गाजला होता. लेखक आणि दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरने ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘फर्जंद’ नंतर आता ‘शेर शिवराज’ चित्रपटाचीव निर्मीती केली आहे. या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांचा संघर्ष आणि अतुलनीय शौर्य या चित्रपटांतून पाहायला मिळत आहे. सध्या चर्चेत असलेल्या ‘शेर शिवराज’ चित्रपटातील एक महत्वाची भूमिका स्वतः दिग्पाल लांजेकर साकारणार असल्याची घोषणा त्याने केली आहे. 

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, प्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर सध्या त्याच्या ‘शेर शिवराज’  चित्रपटामुळे सर्वत्र चर्चेत आहे. या दमदार चित्रपटाची प्रेक्षकांना आणि जगभरातील शिवप्रेमींना मोठी उत्सुकता लागली आहे. हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवाजीराजेंच्या स्वराज्यनिर्मितीमध्ये अतुलनीय शौर्य दाखवणाऱ्या प्रत्येक मावळ्याचा इतिहास या चित्रपटांमधून दाखवला जात आहे. त्यामुळेच सध्या शेर शिवराज  चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखा महत्वाची मानली जात आहे. अलिकडेच स्वराज्याचे गुप्तहेर बहिर्जी नाईक यांची भूमिका कोण साकारणार याबद्दलची चर्चा रंगली होती. आता ही भूमिका स्वःत दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर साकारणार असल्याची माहिती समोर आली आहे.या बाबतची घोषणा दिग्पालनेच सोशल मीडियावरुन केली आहे.

दरम्यान ‘शेर शिवराज’ हा बहुचर्चित चित्रपट २२ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात शिवरायांच्या आयुष्यातील अनेक धाडसी प्रसंग दाखवले जाणार आहेत. या चित्रपटात छत्रपती शिवरायांची दमदार भूमिका चिन्मय मांडलेकरने साकारली आहे. सध्या या चित्रपटाची संपूर्ण टीम चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी प्रतापडालाही भेट दिली होती. या चित्रपटात अफजल खान वधाचाही प्रसंग दाखवण्यात येणार आहे त्यामुळे पून्हा एकदा राज्यातील चित्रपटगृहे शिवरायांच्या घोषणांनी गरजणार आहेत अशीच चर्चा सर्वत्र रंगली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

    हेही वाचा- 

 

 

हे देखील वाचा