Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

एकतावर कोसळलं संकटांचा डोंगर, तीन महिन्यांपासून जवळचा व्यक्ती दूर, सरकारकडे केली मदतीची याचना

चित्रपट निर्माती एकता कपूर हिच्यावर संकटांचा डोंगर कोसळला आहे. तिच्या एक्सएक्सएक्स मालिकेतील वाद चालूच हाेता की, तिच्या समाेर आणखी एक संकट आलं आहे. एकता कपूरने एक खुलासा केला आहे, ज्याने मनोरंजन क्षेत्र चांगलेच हैराण आहेत. बालाजी टेलिफिल्म्सचे माजी सीओओ झुल्फिकार खान बेपत्ता झाल्याचे एकताने सांगितले. या संबधी तिने सरकारकडे मदतीचे आवाहन केले आहे.

एकता कपूर (ekta kapoor) हिने शुक्रवारी (दि.21 ऑक्टाेबर) रात्री भारत सरकार आणि मानवतावादी संस्था केनिया रेड क्रॉसकडे तिच्या बॅनर बालाजी टेलिफिल्म्सचे माजी सीओओ झुल्फिकार अहमद खान यांना शोधण्यासाठी मदतीचे आवाहन केले.

एकता कपूरने सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितले की, “झुल्फिकार गेल्या काही दिवसांपासून नैराबी येथून बेपत्ता आहे. खान जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात नैराबी येथून बेपत्ता झाला होता. बेपत्ता होऊन तीन महिने झाले आहेत. ही बातमी समोर आल्यानंतर संपूर्ण मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे. माहितीसाठी, एकता कपूरशिवाय करण कुंद्रानेही झुल्फिकारचा शोध घेण्याचे आवाहन केले आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by EktaaRkapoor (@ektarkapoor)

एकता कपूरने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिले की, “बालाजी टेलिफिल्म्स लिमिटेडचे ​​आमचे माजी सीओओ झुल्फिकार अहमद खान तीन महिन्यांपूर्वी नैराबी येथून बेपत्ता झाले आहेत. मी परराष्ट्र मंत्रालय आणि केनिया रेडक्रॉसला विनंती करते की, कृपया याकडे त्यांनी लक्ष द्यावे.”

एकताच्या काराकीर्द विषयी बाेलायचे झाले, तर एकता कपूरने मनोरंजन विश्वात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. गेल्या दोन दशकांपासून ती टीव्ही इंडस्ट्रीवर राज्य करत आहे. यामुळेच लोक तिला ‘टीव्ही क्वीन’ म्हणतात. एकता कपूरने टीव्ही इंडस्ट्रीला अनेक सुपरहिट मालिका दिल्या आहेत, ज्या आजही लोकांच्या हृदयावर राज्य करतात.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
‘डबल एक्लएल’च्या पडद्यामागील मस्ती पाहायची आहे का? हा व्हिडिओ पाहाच

राजू श्रीवास्तव यांच्या आठवणींना पत्नीने दिला उजाळा, भावूक होऊन व्हिडिओ केला शेअर

हे देखील वाचा