Tuesday, July 23, 2024

‘डबल एक्लएल’च्या पडद्यामागील मस्ती पाहायची आहे का? हा व्हिडिओ पाहाच

बाॅलिवूड लाेकप्रिय अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेत्री हुमा कुरेशी सध्या त्यांच्या आगामी ‘डबल एक्सएल‘ चित्रपटामुळे खूप चर्चेत आहेत. नुकतेच या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान ‘दबंग गर्ल’ सोनाक्षी सिन्हा खूपच कूल लूकमध्ये दिसली होती आणि तिच्या या लूकने तिच्या चाहत्यांची तारांबळ उडाली होती. आता सोनाक्षीने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सोनाक्षीने सेटवर पडद्यामागे घालवलेल्या क्षणांची झलक दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये सोनाक्षी सिन्हा (sonakshi sinha) तिचे सहकलाकार राघवेंद्र(Raghvendra), झहीर इक्बाल(Zaheer Iqbal)आणि हुमा कुरेशी(Huma Qureshi ) सोबत खूप मस्ती करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये कलाकार त्यांच्या ‘डबल एक्सएल’ चित्रपटातील ‘की जाना’ या लेटेस्ट गाण्याचे शूटिंग करताना दिसत आहेत. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये सोनाक्षी सिन्हाने लिहिले, “प्रेम, हास्य, अन्न, मित्र, स्वप्ने….. हेच आमचे खरे आयुष्य आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

यापूर्वी झहीर इक्बालनेही सोनाक्षी सिन्हासोबतच्या पडद्यामागील क्षणांची झलक त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. या व्हिडिओमध्ये झहीर दरवाजाच्या मागे लपून सोनाक्षी सिन्हा आणि हमाल कुरेशीला घाबरवताना दिसत आहे .

 

View this post on Instagram

 

A post shared by Zaheer Iqbal (@iamzahero)

‘डबल एक्सएल’मधील ‘की जाना’ हे गाणे गुरुवारी (दि. 20 ऑक्टाेबर) रिलीज झाले आहे. हे गाणे कविता सेठ आणि कनिष्क सेठ यांनी गायले असून कनिष्क सेठ यांनी संगीत दिले आहे.

डबल एक्सएलची निर्मिती भूषण कुमार यांनी केली आहे. या चित्रपटाची कथा साशा सिंग आणि मुदस्सर अजीज यांनी लिहिली आहे. सोनाक्षी सिन्हाचा हा चित्रपट 4 नोव्हेंबरला बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित हाेणार आहे. या चित्रपटाला कॅटरिना कॅफचा ‘फोन भूत’ आणि जान्हवी कपूरच्या ‘मिली’ टक्कर देणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
जॅकलिन फर्नांडिसच्या जामिन अर्जावर लागेल का सुटकेचा शिक्का?

बीग बॉसने दिलाओपन चॅलेंज! शिव ठाकरेची कॅप्टेन्सी हिसकावून अर्चना सांभाळणार घराची जबाबदारी…

हे देखील वाचा