राजू श्रीवास्तव यांच्या आठवणींना पत्नीने दिला उजाळा, भावूक होऊन व्हिडिओ केला शेअर

0
42
raju shrivastav
photo courtesy: instagram/rajusrivastavaofficial

दिवंगत कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना जगाचा निरोप घेऊन 1 महिना झाला आहे. त्यांना आजही लोक खूपच आठवण करताता. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासठी अनेक कॉमेडियला बोलवून कार्यक्रम देखिल ठेवण्यात आला होता. नुकतंच त्यांची पत्नी शिखा श्रीवास्तव यांनी राजू यांचा एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे. त्यासोबतच त्यांनी आपल्या मनातील दु:ख व्यक्त करत भली मोठी नोट देखिल लिहिली आहे.

राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांची पत्नी शिखा श्रीवास्तव (Shikha Srivastava) यांनी राजू यांची आठण काढत एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे, त्यासोबतच त्यांनी आपल्या मनाची व्यथा मांडत एक भावूक करणारे नोट लिहिले आहे. त्यामुळे हा व्हिडिओ पाहून राजू यांचे चाहते खूपच भावूक झाले आहेत. त्यांना आजही राजू हे जग सोडून गेल्यासारखे वाटत नाहीत. कारण राजू हे सगळ्यांच्या मनामध्ये बसलेले आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सोसल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये राजू श्रीवास्तव स्वत:च्या खोलीमध्ये आरामता बसून किशोर कुमार यांचे ‘यादों में वो सपनों में हैं’ हे गाणे म्हणताना दिसून येत आहे. या व्हिडिओला शेअर करत असताना शिखा श्रीवास्तव यांनी लिहिले की, “तुम्हला गाणे म्हणून एक महिणा झाला आहे, पण आम्हाला माहित आहे की, तुम्ही आजही आमच्यासोबत आहात, आणि नेहमी राहाल…!”, असे कॅप्शनमध्ये लिहिले होते. यानंतर त्यांनी एका नोटमध्ये लिहिले होते की, “धड़कन का बंधन तो धड़कन से है, नैना मेरे असुअन भरे पूछ रहे गए हो कहां, यादों में हो बातों में हो अब तो सिर्फ सपनो में हो…नहीं पता था की ये गाना इतनी जल्दी (सिर्फ 12 दिन में) हकीकत में तब्दील कर दोगे । नहीं पता था की धड़कन ही धोखा दे जाएगी, सबको हंसाते-हंसाते हमें यूं रुला जाओगे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Raju Srivastav (@rajusrivastavaofficial)

शिखा श्रीवास्तवची अशी दु:खदायक पोस्ट पाहून चाहतेही खूपच दु:खी झाले आहेत. या व्हिडिओवर चाहतेही आपल्या प्रतिक्रियांचा वर्षाव करत आहेत. एका युजरने लिहिले की, ‘भाऊ आम्ही तुम्हाला कधीच विसरु शकत नाही, आय लव्ह यू, आय मिस यू’, तिथेच दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘आजही विश्वास बसत नाही’, असे म्हणत अनेकांनी आपले दु:ख व्यक्त केले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-
जॅकलिन फर्नांडिसच्या जामिन अर्जावर लागेल का सुटकेचा शिक्का?
बीग बॉसने दिलाओपन चॅलेंज! शिव ठाकरेची कॅप्टेन्सी हिसकावून अर्चना सांभाळणार घराची जबाबदारी…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here