Saturday, March 21, 2026
Home बॉलीवूड ‘या’ गोष्टीला नकार दिल्याने ‘तोबराज’च्या दिग्दर्शकाच्या मुलाने केलीय आत्महत्या, पोलिसांचा धक्कादायक खुलासा

‘या’ गोष्टीला नकार दिल्याने ‘तोबराज’च्या दिग्दर्शकाच्या मुलाने केलीय आत्महत्या, पोलिसांचा धक्कादायक खुलासा

देशभरात सध्या होळीच्या सणाची जोरदार चर्चा सुरू असताना आणि सगळेच आनंदात असताना हिंदी चित्रपटसृष्टीत मात्र एक दुःखद घटना घडली. ‘तोबराज’चे दिग्दर्शक गिरीश मलिक (Girish Malik) यांचा मुलगा मननशी झालेला वाद एवढ्या गंभीर आणि मोठ्या घटनेचे रूप घेईल, याची कुणालाही कल्पना नव्हती. मनन हा होळी खेळण्यासाठी घराबाहेर गेला होता आणि घरी आल्यानंतर काही वेळातच हा प्रकार उघडकीस आला, अशी माहिती एका सूत्राने दिली आहे. काय आहे हे सगळे प्रकरण चला जाणून घेऊ.

‘तोबराज’चे दिग्दर्शक गिरीश मलिक यांचा मुलगा मनन याने मुंबईतील अंधेरी भागातील ओबेरॉय स्प्रिंग्स इमारतीतील त्याच्या ५व्या मजल्यावरून पडला. मात्र हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे म्हटले जात आहे. आज त्याचे शवविच्छेदन सिद्धार्थ रुग्णालयात करण्यात आले असून, दिल्लीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मनन फक्त १७ वर्षांचा होता.

एका प्रसिद्ध वृत्तपत्राशी बोलताना आंबोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बंडोपंत बनसोडे म्हणाले, “मनन काही पेय पिऊन होळी खेळून घरी आला. मात्र, तो घरीही मद्यपान करत होता. त्याच्या वडिलांनी द त्याला पिऊ नको असे सांगितले, पण त्याने ऐकले नाही. तो आक्रमकपणे चिडला, खिडकी तोडून बाहेर गेला.” इन्स्पेक्टर बनसोडे पुढे म्हणाले की, “यापूर्वी मनन त्याच्या आईसोबतही भांडला होता. जेव्हा तो दारू प्यायचा तेव्हा अनेकदा त्याला स्वतःवर नियंत्रण ठेवता येत नव्हते. वरवर पाहता, मननने उडी मारली जेव्हा त्याचे वडील त्यांच्या खोलीत गेले आणि आई जवळ नव्हती, बहुधा स्वयंपाकघरात होती. ही दुर्दैवी घटना काल दुपारी उशिरा घडली.”

मननला त्यांच्या घरापासून जवळ असलेल्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांना त्याला वाचविण्यात यश आले नाही.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

हे देखील वाचा