धक्कादायक! होळीच्या दिवशी प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या घरी झाला अपघात, अवघ्या १७ वर्षीय मुलाचा मृत्यू

पूर्ण देशात रंगपंचमीचा सण मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. अशातच या खास मुहूर्तावर ‘तोरबाज’चे दिग्दर्शक गिरीश मलिक (Girish Malik) यांच्या घरी भीषण अपघात झाला आहे. मुंबईतील अंधेरी येथील घराच्या पाचव्या मजल्यावरून पडून दिग्दर्शकाचा मुलगा मनन याचा मृत्यू झाला आहे. त्याने स्वतः इमारतीवरून उडी मारली की, अन्य काही दुर्घटना घडली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मननला तातडीने कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे त्याचा मृत्यू झाला. रिपोर्ट्सनुसार, ही इमारत अंधेरी वेस्टमधील ओबेरॉय स्प्रिंग्स आहे. मनन याच्या ए-विंगमध्ये राहत होता.

रिपोर्टनुसार, तो दुपारी रंगपंचमी खेळण्यासाठी गेला होता आणि नंतर परत आला, त्यानंतर ही घटना घडली. वृत्तानुसार, हा अपघात संध्याकाळी ५च्या सुमारास झाला, त्यानंतर त्याला रुग्णालयात नेले असता त्याचा मृत्यू झाला. गिरीश यांचा मुलगा मनन हा अवघ्या १७ वर्षांचा होता. ‘तोबराज’ या चित्रपटाचे दिग्दर्शक गिरीश मलिक यांचा पार्टनर पुनीत सिंग याने याबाबत माहिती दिली आहे. (tobraaj director girish malik son dies after falling from fifth floor)

ओबेरॉय स्प्रिंग्सजवळ पत्रकारांशी बोलताना पुनीत सिंग म्हणाले की, “मिस्टर मलिक यांच्या मुलाचे निधन झाले आहे. हे सर्व कसे घडले याबद्दल मी तुम्हाला काहीही सांगू शकत नाही.” गिरीश मलिक हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत.

गिरीश यांनी ‘तोरबाज’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते, ज्यात संजय दत्त (Sanjay Dutt), राहुल देव (Rahul Dev) आणि नर्गिस फाखरी (Nargis Fakhri) यांनी प्रमुख भूमिका केल्या होत्या. हा चित्रपट २०२० मध्ये आला होता. गिरीश यांनी बॉलिवूडला ‘तोरबाज’ आणि ‘जल’ सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

Latest Post