Saturday, April 19, 2025
Home मराठी प्रदर्शनाआधीच महेश मांजरेकरांचा ‘हा’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात, महिला आयोगाची केंद्राकडे तक्रार

प्रदर्शनाआधीच महेश मांजरेकरांचा ‘हा’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात, महिला आयोगाची केंद्राकडे तक्रार

सुपरस्टार सलमान खान याच्या ‘अंतिम’ चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी पार पाडल्यानंतर महेश मांजरेकर नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. या चित्रपटाचे नाव ‘नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा’ असे आहे. हा चित्रपट येत्या शुक्रवारी (१४ जानेवारी) चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. मात्र, प्रदर्शनापूर्वीच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्यांबद्दल केंद्रीय माहिती प्रसारण खात्याकडे तक्रार केली आहे.

‘नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा’ या चित्रपटाचा ट्रेलर युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दिसत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अल्पवयीन मुलगा आणि महिलांची आक्षेपार्ह अशी दृश्ये दाखवण्यात आली होती. यामुळे राष्ट्रीय महिला आयोगाने चित्रपटाबद्दल केंद्रीय प्रसारण खात्याकडे पत्राद्वारे तक्रार केली आहे.

पत्रात आयोग म्हणाले की, माहिती व प्रसारण मंत्रालयाने याची दखल घ्यावी आणि अशी दृश्ये सेन्सॉर केली पाहिजेत. यांसारखी दृश्ये खुलेपणाणे प्रसारित करण्यावरही त्यांनी आक्षेप नोंदवला.

सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनचे अध्यक्ष प्रसून जोशी यांच्याकडेही या पत्राची एक प्रत पाठवली आहे.

“मुंबईच्या जंगलातला हा धूर कुणाला सुखासुखी जगून नाय द्यायचा..सगळ्यांची वाट लागणार..! काँक्रीटच्या जंगलातलं वास्तव..पहा ‘नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा’ चित्रपटाचा ट्रेलर..!” असं या चित्रपटाचा ट्रेलर शेअर करत मांजरेकर यांनी लिहिले होते. मांजरेकरांचा दिग्दर्शनातील दांडगा अनुभव पाहता, त्यांचा हा चित्रपटही धमाल करण्याची शक्यता आहे.

महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. नुकताच ‘अंतिम’ हा चित्रपटही चित्रपटगृहात चांगली कमाई करून गेला. चित्रपटसृष्टीत महेश मांजरेकर हे फार मोठे नाव आहे. हिंदी आणि मराठी यांसारख्या भाषेतील चित्रपटात महेश मांजरेकर यांनी काम केले आहे.

हेही पाहा- अभिनेता शाहिद कपूरला आहेत ३ आई आणि ३ बाप

‘वास्तव’ या चित्रपटानंतर महेश मांजरेकर यांना हिंदी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शक म्हणून वेगळे नाव आणि सन्मान मिळाला. ‘वास्तव’ आणि ‘अस्तित्व’ हे त्यांचे गाजलेले सिनेमे. एक दिग्दर्शक म्हणून त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला. वास्तव हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला. ‘अस्तित्व’साठी त्यांना नॅशनल अवॉर्ड मिळाला. २०१८ पासून ते ‘बिग बॉस मराठी’ या रियॅलिटी शोचे सूत्रसंचालन करत आहेत.

हेही वाचा-

हे देखील वाचा