Friday, March 29, 2024

दोन मुलींनंतर आता माजी ‘मिस युनिव्हर्स’ तिसऱ्यांदा बनली आई? तीन मुलांसोबत हॅप्पी दिसली अभिनेत्री

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आपल्याला पाहायला मिळतात, जे आपल्या अभियनाव्यतिरिक्त इतर चांगल्या कामांमुळेही चाहत्यांच्या मनात कायमचे स्थान बनवतात. या कलाकारांमध्ये समावेश होतो तो म्हणजे अभिनेत्री सुष्मिता सेनचा. सुष्मिताने तिच्या सहजसुंदर अभिनयाने बॉलिवूड तर गाजवले आहेच, परंतु तिने लग्न न करता सिंगल मदर राहून दोन मुलींना दत्तक घेऊन सर्व जगापुढे एक उदाहरण ठेवले आहे. तिने २००० साली मुलगी रिनीला दत्तक घेतले होते. त्यानंतर तिने २०१० साली अलिशाला दत्तक घेतले होते. ती आपल्या मुलींवर जीवापाड प्रेम करते तसेच एका आईच्या सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करते. आता असे वृत्त आहे की, तिने एक मुलगाही दत्तक घेतला आहे.

हेही पाहा- अभिनेता शाहिद कपूरला आहेत ३ आई आणि ३ बाप

तीन मुलांसोबत दिसली सुष्मिता सेन
बुधवारी (१२ जानेवारी) सुष्मिता (Sushmita Sen) तिच्या घराबाहेर आपल्या दोन मुली आणि एका मुलासोबत स्पॉट झाली. ती या तीन मुलांसोबत खूपच आनंदी दिसत होती. मात्र, यावेळी मास्क लावल्यामुळे तिच्या मुलाचा संपूर्ण चेहरा स्पष्ट दिसू शकला नाही. असे असले, तरीही सुष्मिताने अद्याप या बातमीला दुजोरा दिलेला नाहीये.

सुष्मिताच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलायचं झालं, तर नुकतेच तिचे रोहमन शॉलसोबत (Rohman Shawl) ब्रेकअप झाले आहे. सुष्मिता दीर्घ काळापासून रोहमनसोबत रिलेशनशिपमध्ये होती. मात्र, तिने हे नातं संपल्यानंतरही स्वत:ला मजबूतीने सांभाळले आहे.

‘या’ वेबसीरिजमध्ये शेवटची झळकली होती सुष्मिता
सुष्मिताच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर सुष्मिताने १९९४ साली ‘मिस युनिव्हर्स’ हा किताब पटकावला होता. यानंतर तिने १९९६ साली प्रदर्शित झालेल्या ‘दस्तक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. यानंतर ती अनेक हिट चित्रपटात झळकली. ती शेवटची ‘आर्या २’मध्ये झळकली होती. तिची ही वेबसीरिज प्रेक्षकांना भलतीच आवडली होती. एका मुलाखतीदरम्यान सुष्मिताने ती लवकरच आर्याच्या तिसऱ्या सिझनच्या शूटिंगला सुरुवात करणार असल्याचे सांगितले आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा