Saturday, July 27, 2024

‘हा’ माणूस नसता, तर चित्रपटात कधीच दिसली नसती गाणी, वाचा चित्रपटात गाणी आणणाऱ्या अवलियाची कथा

हिंदी चित्रपट आणि संगीताचे नाते खूपच घट्ट आहे. आजपर्यंत असा कोणताच चित्रपट तयार झाला नाही, ज्यामध्ये गाणे नसेल. अनेक चित्रपट फक्त त्यामधल्या सुपरहीट गाण्यांमुळे लोकप्रिय ठरतात आणि आठवणीतही राहतात. पण एक काळ असा होता, जेव्हा सिनेमात गाणी वापरली जात नव्हती. आज आम्ही तुम्हाला अशा प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वाबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्यामुळे पहिल्यांदाच चित्रपटांमध्ये गाणी वापरली गेली. कोण आहे ती व्यक्ती आणि काय आहे त्यांची कथा चला जाणून घेऊ. 

बॉलिवूड चित्रपट आणि गाणी यांचे खूप जवळचे नाते आहे. क्वचितच असा कोणताही हिंदी चित्रपट बनला असेल ज्यामध्ये गाणी नसतील. मात्र या सगळ्याची सुरूवात केली नितीन बोस (Nitin Bose) नावाच्या एका व्यक्तीने. होय, आम्ही बोलत आहोत भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नितीन बोस यांच्याबद्दल. २६ एप्रिल १८९७ रोजी जन्मलेल्या नितीनने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात न्यू थिएटरमधून केली. यामध्ये हिंदी आणि बंगाली अशा दोन्ही भाषांमध्ये चित्रपटांची निर्मिती करण्यात आली. नितीन बोस यांच्या वडिलांनी फोटोग्राफीमध्ये प्रभुत्व मिळवले होते. नितीनला फोटो काढण्याचीही खूप आवड होती. त्याच्या वडिलांना हे कळल्यावर त्यांनी आपल्या मुलाला फोटोग्राफीचे बारकावेही शिकवायला सुरुवात केली.

साल १९३१मध्ये आलेला ‘अलमारा’ हा भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिला चर्चेत असलेला चित्रपट होता. तेव्हा चित्रपटात गाणी नव्हती. त्यानंतर कलाकार सेटवरच गाणे लाइव्ह म्हणायचे. याशिवाय हे गाणे डायलॉगसारखे गायले होते. चित्रपटांमध्ये पार्श्वगायनाचे श्रेय नितीन बोस यांना जाते. १९३५ साली प्रदर्शित झालेल्या ‘भाग्य चक्र’ या बंगाली चित्रपटात पार्श्वगायनाचा प्रथम वापर करण्यात आला. त्यानंतर ‘धूप छॉन’मध्येही तेच केले गेले, त्याचा हिंदीत रिमेक बनवला गेला. या चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी त्यांचे बंधू मुकुल बोस आणि संगीतकार रायचंद बोराल यांच्यावर देण्यात आली होती.

नितीन बोस यांचा हा प्रयोग इतका यशस्वी झाला की, त्यानंतर चित्रपटांमध्ये पार्श्वगायनाची प्रथा सुरू झाली. आज भारतीय चित्रपटसृष्टीत दरवर्षी शेकडो चित्रपट बनतात, ज्यात गाणी नक्कीच असतात. हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक चित्रपट केवळ गाण्यांमुळेच हिट झाले आहेत. आपल्या फिल्मी करिअरमध्ये त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले. त्यांनी ‘दुश्मन’, ‘मिलन’, ‘दीदार’, ‘गंगा-जमुना’, ‘कठपुतली’ असे चित्रपट केले. चित्रपटातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना १९७७ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
“दगडाची किंमत वाढवत आहे” घटस्फोटानंतर आयुष्यात पुढे जाणाऱ्या ‘या’ मराठी अभिनेत्री पोस्ट झाली व्हायरल

दमदार अंदाजमध्ये तलवारबाजी करताना दिसली सुश्मिता सेन, व्हिडिओ शेअर करत लिहिले…

हे देखील वाचा