Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

Dangerous Khatra Trailer| लिपलॉकपासून बेडरूमपर्यंत, देशातील पहिला लेस्बियन चित्रपट मोडेल बोल्डनेसच्या सर्व सीमा

दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (Ram Gopal Verma) यांच्या ‘खतरा डेंजरस’ (Dangerous Khatra Trailer) या चित्रपटाचा ट्रेलर २ प्रदर्शित झाला आहे. हा भारतातील पहिला लेस्बियन क्राईम ऍक्शन ड्रामा चित्रपट असेल. हा चित्रपट ८ एप्रिल २०२२ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. तीव्र रोमान्स, क्राइम आणि सस्पेन्सने भरलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर मर्यादेपेक्षा अधिक बोल्ड आहे.

कसा आहे राम गोपाल वर्माच्या चित्रपटाचा ट्रेलर?
हा चित्रपट रोमँटिक सीन्सने भरलेला आहे. किसिंग सीनपासून बेडरूम रोमान्सपर्यंत बोल्डनेसने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. जवळीक आणि प्रौढ सामग्रीमुळे या चित्रपटाला ए प्रमाणपत्र मिळाले आहे. चित्रपटाची कथा दोन महिलांची आहे, ज्या एकमेकांच्या प्रेमात पडतात. त्या समलैंगिक संबंधात राहतात. चित्रपटाच्या स्टारकास्टबद्दल बोलायचे झाले, तर साऊथ चित्रपटातील हॉट आणि सनसनाटी दिवा अप्सरा राणी आणि नयना गांगुली यात मुख्य भूमिकेत आहेत.

बोल्डन्सची केली हद्द पार
हा आतापर्यंतचा सर्वात बोल्ड चित्रपट म्हणून ओळखला जात आहे. चित्रपटाचा ट्रेलर समोर आल्यानंतर ही गोष्ट बर्‍याच अंशी खरी ठरते. या चित्रपटाचीही जोरदार चर्चा आहे. राम गोपाल वर्मा यांनी ते तयार केले आहे. चित्रपटाचे पोस्टर्स देखील खूप बोल्ड आहे. आतापर्यंत तुम्ही पाहिलेल्या चित्रपटांपैकी हा सर्वाधिक बोल्ड चित्रपट ठरेल, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

‘खतरा डेंजरस’ (Dangerous Khatra) या चित्रपटातील बोल्डनेस पाहून तुम्हाला घाम फुटला असेल. लिप लॉकिंगपासून इंटिमेट सीन्सपर्यंत सगळेच टोकाचे आहे. या चित्रपटाला सॉफ्ट पॉर्न म्हटले, तर चुकीचे ठरणार नाही. तसे पाहता या चित्रपटाला प्रेक्षकांचा देखील उघड पाठिंबा मिळत आहे. प्रेक्षक म्हणतात प्रेम म्हणजे प्रेम. अनेकांनी चित्रपटाची थीम चमकदार असल्याचे वर्णन केले आहे. आता हा चित्रपट किती अप्रतिम आहे, हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच कळेल.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

हे देखील वाचा