साजिद खानला अलीकडेच ‘बिग बॉस 16‘ या टीव्ही शोमधून बाहेर काढण्यात आले आहे. अशात घरातून बाहेर पडताच तो अनेकांच्या निशाण्यावर आला आहे. साजिद बिग बॉसच्या घरात गेला तेव्हापासून त्याच्यावर टीका करण्यात येत होती. #MeToo चळवळीदरम्यान अनेक अभिनेत्रींनी त्यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. अनेक अभिनेत्री आणि महिला संघटनांनी त्याला शोमधून काढून टाकण्याची मागणीही केली होती. पण हे होऊ शकले नाही. आता साजिद स्वतःच्या इच्छेने शोमधून बाहेर पडला आहे आणि आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहे.
दरम्यान, अभिनेत्री मिनिषा लांबा(minissha lamba) हीने एका मुलाखतीत साजिद खानवर गंभीर आरोप केले आणि त्याला ‘जनावर’ म्हणजेच ‘हैवान’ म्हटले आहे. अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान मिनिषाला बिग बॉस, साजिद खान आणि मी टू चळवळीबद्दल विचारण्यात आले. त्यावर ती म्हणाली, “मी टू चळवळ महिलांसाठी खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे जगभरातील महिलांना मोकळेपणाने बोलण्याची संधी मिळाली.”
मिनिषा लांबा पुढे म्हणाली, “ती एक क्रांती होती जी फक्त एका चिंगारीची वाट पाहत होती. तुम्ही ज्या ‘जनावर’बद्दल बोलत आहात त्याबद्दल जेवढे कमी बोलले जाईल तेवढे चांगले.” पुढे मिनिषाने तिच्या करिअरबद्दलही सांगितले. तिला पत्रकार व्हायचे होते आणि नंतर संधी मिळाल्यावर चित्रपटात आल्याचे तिने सांगितले.
View this post on Instagram
मिनिषा लांबा पुढे म्हणाली, “मला त्या वेळी ज्या प्रकारचे मार्गदर्शन हवे होते ते माझ्याकडे नव्हते. मी स्वतः सर्व काही केले आणि जेव्हा मी मागे वळून पाहतो तेव्हा मी अधिक शहाणी होते. निश्चितपणे, जर मला ते पुन्हा करावे लागले तर मी काही गोष्टी वेगळ्या पद्धतीने करेन.” मिनिषा अनेक वर्षांपासून चित्रपटांपासून दूर आहे.
मिनिषा लांबाने 2005 मध्ये शूजित सरकारच्या ‘यहाँ’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. नंतर ती ‘हनीमून ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड’, ‘बचना ए हसीनो’, ‘किडनॅप’ आणि ‘भेजा फ्राय 2’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसली. मिनिषा ‘बिग बॉस 8’ या रिऍलिटी शोचाही भाग होती. पण सध्या ती बॉलिवूडमधून गायब आहे.(director sajid khan creature out from big boss 16 who is actress minissha lamba says to director)
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दाक्षिणात्य अभिनेत्री शुभ्रा अय्यप्पाने बॉयफ्रेंडसोबत गुपचूप केले लग्न, पाहा भन्नाट फाेटाे
चाळीशी ओलांडलेल्या श्वेता तिवारीच्या ‘हा’ डान्स व्हिडिओ पाहून नेटकरी झाले फिदा










