बॉलिवूडमध्ये दु:खाचे वारे वाहत आहेत. एकापाठोपाठ एक दिग्गज व्यक्तींचे निधन झाल्याच्या बातम्या येत आहेत. चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांचे मोठे भाऊ वीर चोप्रा यांचे कोरोना व्हायरसमुळे निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. नुकतेच बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार आणि ‘हॉरर’ चित्रपट निर्माते कुमार रामसे यांच्या निधनाने सर्वांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
वीर चोप्रा यांनी विधू यांच्यासोबत ‘मुन्ना भाई एमबीबीएस’, ‘ब्रोकन हॉर्सेस’, ‘लगे रहो मुन्ना भाई’ आणि ‘3 इडियट्स’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते. (Director Vidhu Vinod Chopra Elder Borther Vir Chopra Died Due To Corona Virus)
माध्यमांतील वृत्तानुसार, वीर चोप्रा यांचे निधन ५ जुलैला झाले होते. मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गेले असता, वीर यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर लगेच त्यांना मुंबईच्या एच.एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे २१ दिवस त्यांना ठेवण्यात आले होते. त्यांना आयसीयूमध्ये ठेवले होते. ५ जुलैच्या सायंकाळी त्यांचे निधन झाले आणि ६ जुलैला त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
वीर चोप्रा साऊंड डिझायनर नमिता नायक चोप्रा यांचे पती आणि अभिनेता अभय चोप्रा म्हणजेच विक्की चोप्राचे वडील होते. वीर यांनी ‘फरारी की सवारी’, ‘एकलव्य: द रॉयल गार्ड’, ‘परिणीता’, ‘मिशन कश्मीर’ आणि ‘करीब’ यांसारख्या चित्रपटांचा निर्माता म्हणूनही काम केले होते.
‘या’ कलाकारांचे झाले कोरोनामुळे निधन
कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत अनेक कलाकारांचे निधन झाले आहे. त्यामध्ये बिक्रमजीत कंवरपाल, श्रवण राठोड, सतीश कौल, किशोर नांदलसकर, कनुप्रिया या दिग्गज कलाकारांचा समावेश आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-नसीरुद्दीन शाह यांना ८ दिवसांनी मिळाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, मुलाने फोटो शेअर करत दिली माहिती